![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी):लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन गु. रजि. नं.45/2023 महाराष्ट्र प्राणी अधिनियम 9,11 वरील चार महिन्यापासून फरार आरोपीस लोणावळा शहर पोलिसांनी पाठलाग करून मोठया शिताफिने ताब्यात घेतले. नदीम जाफर कुरेशी (वय वर्ष 35, रा. टेबल लँड, लोणावळा ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पथक लोणावळा हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना बातमीदारमार्फत बातमी मिळाली की लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन गु. रजि. नं.45/2023 महाराष्ट्र प्राणी अधिनियम 9,11 वरील फरार आरोपी नदीम हा त्याच्या घरी आला असल्याची पक्की खबर मिळताच. पोलीस पथक टेबल लँड येथील आरोपीच्या घरी गेले असता पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी पळून जाऊ लागला. पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून मोठया शिताफिने त्याला अटक केले. त्याच्याकडून चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली.
लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सिताराम डुबल, पोलीस उपनिरीक्षक लतिफ मुजावर, पोलीस हेडकॉन्स्टेबल शकील शेख, जयराज पाटणकर, पोलीस कॉन्स्टेबल मनोज मोरे, सुधीर डुंबरे, शेखर कुलकर्णी, राहुल चोरगे, रमेश उगले यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे.