सुधाकर भाऊ घारे फाऊंडेशनची साथ नेहमीच – कधीही – कुठेही !
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) जन्मजात कानाने ऐकू येत नाही , त्यातच सहा महिन्यांची असतानाच त्या चिमुकलीच्या जीवनात एक अघटीत घटना घडली , तिच्या जीवनातील तिचा आधारस्तंभ , तिच्या जीवनाचा पोशिंदा म्हणजे ” बापाचं ” छत्र हरवल . आईच्या जीवनात अंधकार झाला , आपला कुंकवाचा आधार गेला , काय करावं – कस करावं , याच चिंतेत , त्यात चिमुकलीचा आजार , अस जीवघेणं ओझ सांभाळत दिवस काढत असताना चिमुकली दिड वर्षांची झाली , आणि आशेचा किरण त्या माय माऊलीला दिसला , जणू काही देव माणूसच……सुधाकर भाऊ घारे यांच्या रूपात !
कर्जत खालापूर मतदार संघातील नागरिकांच्या मदतीला नेहमीच धावून जाऊन त्यांचं दुःख हलक करण्याचा प्रयत्न सुधाकर भाऊ घारे फाऊंडेशनचे सर्वेसर्वा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राजिप चे मा. उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे करत असतात . आपणही या समाजाचे काही देणे आहोत , या उद्दात्त भावनेने केलेली मदत समस्याग्रस्त नागरिकांना ” कवच कुंडले ” ठरत आहेत.
माथेरान येथे रहाणारे निकिता अनिकेत उतेकर या महिलेची दिड वर्षांची चिमुकली ” ग्रीती ” हिला जन्मजात कानाने ऐकू येत नव्हते , त्यामुळे तिला बोलता हि येत नसल्याने व ती सहा महिन्यांची असताना तिचे बाबा अनिकेत उतेकर यांचा अकाली मृत्यू झाला . आपले छत्र हरवल्याने जीवन अंधकारमय झाल्याचे दिसले , पण चिमुकली ग्रिती च्या रुपात जीवन जगण्याची उमेद होती.
तिला ऐकू आल्यास ती बोलू हि शकेल , अशी आस असताना डॉ. च्या म्हणण्यानुसार यासाठी खर्च भरपूर येणार होता . श्रवण यंत्र लावल्यास तिला ऐकू येईल , असे डॉ. यांनी सांगितल्यावर त्याचा होणारा १ लाख रुपये खर्चाची जुळवणी कुठून होणार ? या चिंतेत हि माय माऊली असताना माथेरान येथील मा. नगरसेवक तथा पत्रकार दिनेश सुतार यांच्या प्रयत्नाने , हि बाब रायगड भूषण तथा सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी सर् यांच्या कानावर गेल्यावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा सुधाकर भाऊ घारे फाऊंडेशनचे सर्वेसर्वा सुधाकर भाऊ घारे यांना सांगितली.
त्यांनी त्वरित पुण्याच्या डॉ. कडून श्रवण यंत्राचे कोटेशन मागवून आज शनिवार दिनांक २८ सप्टेंबर २०२४ रोजी चिमुकली ग्रिती ची माय माऊली निखिता अनिकेत उतेकर यांना १ लाख ९ हजारांचा चेक सुपूर्त केला .
दिड वर्षांची ग्रिती हिला आता ऐकायला येईल , बोलायला जमेल , त्यामुळे या माय माऊलीचा उर भरून आला . ग्रीती ला श्रवण यंत्राद्वारे ” कवच कुंडले ” देणारे ” दानशूर व्यक्तिमत्त्व सुधाकर भाऊ घारे ” यांचे त्यांनी खूप खूप आभार व्यक्त केले .