Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडछत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभीकरणाचे भूमीपूजन नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते संपन्न..

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभीकरणाचे भूमीपूजन नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते संपन्न..

भिसेगाव-कर्जत/सुभाष सोनावणे-

कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव प्रभागात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे सुशोभीकरण – नुतनीकरण भूमिपूजन सोहळा मॉसाहेब जिजाउ जयंती या शुभ मुहुर्तावर दि. २८ जानेवारी २०२१ रोजी संध्याकाळी कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ.सुवर्णा केतन जोशी यांच्या शुभहस्ते पार पडले.

यावेळी स्मारकाचे भूमिपूजन प्रसंगी युवा सेना रायगड जिल्हा अधिकारी मयूर जोशी , नगरसेवक तथा पाणी पुरवठा सभापती बळवंत घुमरे , नगरसेवक विवेक दांडेकर , नगरसेवक सोमनाथ ठोंबरे, नगरसेविका संचिता पाटील, नगरसेविका स्वामिनी मांजरे , नगरसेविका पुष्पा दगडे , माजी नगरसेविका यमुताई विचारे, ऍड.गायत्री परांजपे , उद्योजक केतन जोशी तसेच भिसेगाव पोलीस पाटील संजय हजारे आणि ग्रामस्थ,महिला वर्ग तसेच तरुण मित्र मंडळ उपस्थित होते.

राजमाता जिजाऊ जयंती निमित्त मॉ साहेब यांच्या प्रतिमेचे पुजन, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुजन करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभीकरण म्हणजेच नव्याने नूतनीकरण करण्यात येणार आहे.

सदरच्या नुतनीकरण तथा सुशोभीकरण करण्यासाठी भिसेगाव तरुण मंडळाने नगराध्यक्षा सौ. सुवर्णा जोशी यांना सांगितले असता हे सुशोभीकरण काम पालिकेच्या माध्यमातून ७ लाख रुपये खर्च करून होणार आहे.तर यावेळी ग्रामस्थांनी ईतर प्रलंबित कामाची आठवण करुन देण्यात आली,यात भिसेगाव गेट येथे रेल्वे सब पुल,चारफाटा ते निलगिरी कॉंक्रीट रस्ता,अणि श्रीशिवस्मारकामधील छत्रपती शिवाजी महाराज यांची पंच धातुची मूर्ती.त्यानुसार प्रलंबित कामे वेळेत पुर्ण होतील असे आश्वासन मा.नगराध्यक्षा सौ.सुवर्णा जोशी यांच्याकडुन देण्यात आले.


भुमीपुजन सौ.सुवर्णा जोशी व उपस्थित नगर सेवक यांच्याकडुन कुदळ मारुन तसेच श्रीफळ वाढवुन करण्यात आले. यावेळी भिसेगाव ग्रामस्थ राम ठोंबरे , विभागप्रमुख मोहन भोईर,दिनेश भरकले, मिलिंद दिसले,योगेश भरकले, केतन जोशी,संदीप भोईर,सुरेश भरकले, प्रेमनाथ गोसावी ,विनायक लाड,रोशन ठोंबरे, बंधू कडू,जगदीश दिसले,सुनील दिसले,वसंत हजारे,तात्या हजारे, वामन खंडागळे, सतीश हजारे,नाना देशमुख बुवा,रमेश हजारे, वासंती बोराडे,मनीषा ठोंबरे, अर्चना भरकले, चंदू राऊत, मयुरेश चौधरी, नागेश भरकले, शिवाजी दिसले,योगेश नाथा हजारे , जुनघरे ताई , इतर ग्रामस्थ , महिला व तरुण वर्ग उपस्थित होते . छत्रपतींचे स्मारक भिसेगावच्या प्रथदर्शनी भागात असल्याने गावाला भव्यदिव्य स्वरूप येणार आहे .

- Advertisment -

You cannot copy content of this page