Friday, September 20, 2024
Homeपुणेमावळजागृती मित्र मंडळ वाकसई आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न...

जागृती मित्र मंडळ वाकसई आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न…

वाकसई (प्रतिनिधी): जागृती मित्र मंडळ वाकसई मावळ नवरात्र महोत्सवानिमित्त होम मिनिस्टर व पारितोषिक वितरण समारंभ विजया दशमीच्या शुभ मुहूर्तावर संपन्न झाला. आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या पैठणीच्या प्रथम मानकरी ठरल्या श्वेता अक्षय रवने, द्वितीय क्रमांकावर पूनम प्रवीण येवले यांनी बाजी मारली तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्या ठरल्या वनिता अजित कड.
जागृती मित्र मंडळाच्या सालाबादप्रमाणे आयोजित कार्यक्रमात यावर्षी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा महिला आघाडी मावळ अध्यक्षा सायली बोत्रे, शिवसेना तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, शिवसेना पुणे जिल्हा उपप्रमुख सुरेश गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप येवले,माजी सरपंच किसन येवले,उद्योजक प्रतीक देसाई, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कारके आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्रमुख पाहुण्यांचे जागृती मित्र मंडळाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
वाकसई येथील जागृती मित्र मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे देवीची प्राण प्रतिष्ठापना तसेच नऊ रात्र रास गरबा व महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आठव्या माळेचे औचित्य साधून महिलांसाठी होम मिनिस्टर या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात महिलांसाठी तळ्यात मळ्यात, पायाने फुगे फोडणे, पळत जाऊन ग्लासने पाण्याची बाटली भरणे,स्ट्रॉ ने पाणी उचलून ग्लास भरणे, बॉल मानेमध्ये धरून बादली मध्ये टाकणे, बॉल फेकून बाटली उडविणे, ग्लास चे थर लावणे, तसेच नेम धरून बॉल बादलीमध्ये टाकणे तसेच रास गरबा इत्यादी आकर्षक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.सदर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 5 ऑक्टोबर विजया दशमीच्या शुभ मुहूर्तावर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

जागृती मित्र मंडळ वाकसई आयोजित होम मिनिस्टर मध्ये प्रथम क्रमांक व पैठणीचा मान श्वेता अक्षय रवणे यांना मिळाला, द्वितीय क्रमांकाचा मान पूनम प्रवीण येवले तर तृतीय क्रमांकावर वनिता अजित कड यांनी बाजी मारली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्या स्पर्धाकांना सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
जागृती मित्र मंडळ वाकसई नवरात्र उत्सव कमिटी 2022 चे अध्यक्ष प्रतीक येवले, उपाध्यक्ष सुधीर येवले,खजिनदार सौरभ येवले,रितेश शं. येवले, सचिव वैभव येवले,दिपक येवले, सल्लागार अर्यन येवले,कुणाल येवले इत्यादी नवरात्र उत्सव कमिटीचे पदाधिकारी असून, नऊ दिवस उत्सव यशस्वीरित्या पार पाडवा यासाठी मंडळाचे कार्यकर्ते सुरेश येवले, किसन येवले, सुधाकर येवले, पंडित येवले, प्रमोद येवले, विजय येवले, संदीप मेने, अमोल येवले, संदीप येवले,उमेश येवले, गोविंद येवले, जगन्नाथ येवले, सागर येवले, सोमनाथ येवले, शिवाजी येवले,सचिन येवले, त्रिशूल येवले, रोशन येवले, मंगेश येवले, किरण भोईने, नागेश माझिरे,धनु मापारी, प्रमोद येवले, पप्पू सुतार, किरण येवले, दत्ता येवले, दिलीप येवले, सोमनाथ पोशिरे, अजित कड, अक्षय येवले,गणेश येवले, निलेश येवले,बबलू येवले,रवींद्र रसाळ, रवी येवले,अमोल मडके, अजय सुतार,सागर जानिरे, नितीन येवले,मुकेश येवले, वैभव मडके,गणेश सुतार, साहिल शिंदे,संस्कार येवले आदींनी खूप परिश्रम घेतले.
- Advertisment -

You cannot copy content of this page