![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) फ्लॅट च्या वादावरून लक्ष्मी नगर खोपोली ता. खालापूर , जि रायगड येथे ” जातीवाचक शिवीगाळ ” केल्या प्रकरणी राजन नेमिसरण गोयल व आकाश राजन गोयल या पिता पुत्रांवर अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्या अंतर्गत खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने येथे एकच खळबळ उडाली आहे . सदरची तक्रार खोपोली लक्ष्मी नगर येथे रहाणारे सूरज कांबळे यांनी केली असून ते न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
याबाबतीत खालापूर पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारी वरून सविस्तर वृत्त असे की , सुरज चिमन कांबळे वय – ३५ वर्षे, व्यवसाय – रियल इस्टेट रा. वैभव हाइट बिल्डींग , रूम न. १५ व ८ एम. जी रोड वरची खोपोली ता. खालापूर जि. रायगड हे येथे रहात असून ते महार – बौद्ध समाजाचे आहेत . त्यांच्या सोबत त्यांची बहीण रेश्मा व आई असे रहात असून वडील मनमाड येथे तर कधी खोपोली येथे रहातात . कांबळे कुटुंबीयांचा फ्लॅट च्या वादावरून राधिका राजन गोयल , राजन नेमीसरन गोयल यांच्यात ” वैभव हाइट बिल्डींग ” रूम न.१५ व ८ एम जी रोड वरची खोपोली ता. खालापूर या फ्लॅट वरून मा. खालापुर सिव्हील कोर्ट येथे सुमारे सन 2024 दावा नं रेग्युलर दिवाणी 23/2024 असा वाद चालू आहे . सदरचा दावा कोर्टात प्रलंबीत असून तारखा चालू आहेत.
गेल्या महिन्यात दिनांक २५ मार्च २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता खालापूर कोर्टात चालू असलेल्या केसचे तारखेसाठी सुरज कांबळे हे त्यांची बहीण यांच्या सोबत खालापुर कोर्टात हजर राहून दुपारी ०३.३० वाजण्याच्या सुमारास मा. कोर्टाने त्यांना दाव्याची पुढील तारीख २१ एप्रिल २०२५ दिली होती , म्हणून सुरज कांबळे व त्यांची बहीण कोर्टाचे समोर पार्किंग केलेल्या गाडीत बसण्यासाठी जात असताना कोर्टाचे पार्किंगच्या आवारात त्यांचे विरोधक राजन नेमीसरन गोयल व त्यांचा मुलगा आकाश राजन गोयल यांनी सुरज व त्यांच्या बहिणीस उद्देशून बोलले की, कशी तुमची ” महारांची ” जिरवली, तुमची लायकी नाही आमचे बरोबर राहण्याची, कशी हाकलून दिल, कसा माज जिरवला, आम्ही कोर्टच खिशात घालतो, असे बोलून सुरज कांबळे व त्यांच्या बहिणीचा चार चौघात जातीवाचक शब्द वापरून ” अपमान ” केला, नंतर ते दोघे त्यांची कार नं. MH/46/BZ/9000 यामधून कोर्टाचे आवारातून काहीही न बोलता निघून गेले.
आम्ही महार – बौद्ध समाजाचे असून सदरची माहिती राजन नेमीसरन गोयल व त्यांचा मुलगा आकाश राजन गोयल यांना माहित असताना सुद्धा आम्हाला आमच्या जातीवरून ” जातीवाचक शिवीगाळ ” करून आमचा ” अपमान ” केला आहे , म्हणून गोयल पिता – पुत्राच्या विरोधात सुरज कांबळे यांनी तक्रार केली आहे . याबाबतीत अधिक तपास खालापूर ( डी वाय एस पी ) पोलीस उप अधिक्षक विक्रम रमाकांत कदम हे करत आहेत .