Friday, October 18, 2024
Homeपुणेलोणावळाजाळीत अडकलेल्या जुळ्या घोणस सापांना वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून जीवदान..

जाळीत अडकलेल्या जुळ्या घोणस सापांना वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून जीवदान..

लोणावळा (प्रतिनिधी): जाळीत अडकलेल्या जुळ्या घोणस जातीच्या सापांची वन्यजीव रक्षक संस्थेच्या सदस्यांकडून सुखरूप सुटका करण्यात आली.
वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांनी दिलेल्या माहिती नुसार साते गाव येथे एका जाळ्यात घोणस जातीच्या सापांचे जुळे अडकले असल्याची माहिती उमेश गावडे यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे जिगर सोलंकी यांना दिली.
तसेच तुषार सातकर, केतीका कासेटवार, झाकीर शेख, जिगर सोलंकी यांनी जाऊन सुरक्षित त्या दोन्ही घोणस रेसक्यू करून त्यांची प्राथमिक तपासणी करून त्यांना जंगलात सोडून दिले.
सोसायटी मधले अविनाश शिंदे, विनायक निकम, दिनेश यादव यांनी सापन मारता त्यांना वाचवलं पाहिजे म्हणून लगेच संपर्क केला. केतीका कासेटवार आणि तुषार सातकर यांनी लोकांमध्ये जनजागृति केली, घोणस हा विषारी जातीचा साप आहे आणि कोणीही अजगर समजून त्याला पकडू नये आणि सर्प मारू नये असे आवाहन केले.कोणताही वन्यप्राणी जखमी अवस्थेत अढळ्यास जवळ पासच्या प्राणीमित्रांना किंवा वनविभागाला संपर्क (1926)या क्रमांकावर संपर्क करावा असे आव्हान वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे आणि अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी केले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page