कार्ला : चैत्रपौर्णिमेच्या पाश्वभूमीवर एकविरा देवी जत्रेच्या नियोजनाबद्दल कार्ला , वेहरगाव , एकविरादेवी पायथा परिसराला जिल्हाधिकारी राजेश देशमुख, प्रांत संदेश शिर्के व तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी भेट दिली .यावेळी चैत्रपोर्णिमेची तयारी कशी होत आहे. याची माहिती घेतली व विविध उपाययोजनासंदर्भात सुचना दिल्या.तसेच आज राजेश देशमुख यांच्या हस्ते मळवली जवळ इंद्रायणी नदीपात्रातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शिलाटणे राष्ट्रीय महामार्ग ते शिलाटणे गाव या रस्त्याचे उदघाटन व कार्ला येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याची पाहणी केली . तसेच कार्ला एमटीडीसी जुन्या रस्त्याचे भुमिपूजन जिल्हाधिकारी राजेश देशमुख , प्रांत अधिकारी संदेश शिर्के , तहसिलदार मधुसूधन बर्गे , कार्ला सरपंच दिपाली हुलावळे , वेहरगाव सरपंच अर्चना देवकर , शिलाटणे सरपंच गुलाब आहिरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कार्ला , वेहरगाव , शिलाटणे गावातील नागरिकांच्या विविध समस्या व त्यावरील उपाय याबाबत चर्चा करण्यात आली.
तसेच एकविरादेवी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाच्या पार्किंगचा प्रश्न व त्यासाठी पर्यायी रस्ता याबाबत त्यांनी लगेच पीएमआरडीए अधिकारी यांना फोन लावून पर्यायी रस्ता मार्गी लावावा अशा सूचना दिल्या.यावेळी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद हुलावळे , मावळ तालुका राष्ट्रवादीचे कॉंग्रेस कार्याअध्यक्ष दिपक हुलावळे , माजी जिल्हापरिषद सदस्य भाई भरत मोरे , मिलिंद बोत्रे , खरेदी विक्री माजी चेअरमन बाळासाहेब भानुसघरे , कार्ला उपसरपंच किरण हुलावळे , वेहरगाव उपसरपंच काजल पडवळ , शिलाटणे उपसरपंच मनिषा भानुसघरे , ग्रामपंचायत सदस्य राजू देवकर , सचिन हुलावळे , सनी हुलावळे , सागर जाधव , शंकर बोरकर , अनिल गायकवाड , शरद आहिरे, उज्वला गायकवाड , वत्सला हुलावळे , सोनाली मोरे , भारती मोरे , पुजा पडवळ , कांचन भानुसघरे , माधुरी भानुसघरे , रुपाली कोंढभर , अश्विनी भानुसघरे , कार्ला मंडल अधिकारी मानिक साबळे ,पंचायत समिती अभियंता सुनिल तम्हाणे , बाळासाहेब सायकर , कार्ला तलाठी मिरा बोऱ्हाडे , ग्रामसेवक सुभाष धोत्रे , गणेश आंबेकर , अश्विनी झेंडे , पोलिस पाटील अनिल पडवळ , कार्ला पोलीस पाटील संजय जाधव , गुरुनाथ मांडेकर , गुलाब तिकोणे , चंद्रकांत देवकर , हेमंत भानुसघरे , तानाजी भानुसघरे , संभाजी भानुसघरे , विष्णू गायखे , अनंता ढवळे , दत्तात्रय जाधव , संदिप देवकर , काळूराम थोरवे , बाळासाहेब येवले , लक्ष्मण मोरे , संजय देवकर , अशोक पडवळ , विनायक कोंढभर , शिवाजी कुटे , गणेश बोरकर दिपक जंगम , विठ्ठल हुलावळे , अरुण भानुसघरे , भरत हुलावळे , रामदास भानुसघरे , अनिल भानुसघरे , अंकुश आहिरे , दत्ता भानुसघरे यांच्यासह वेहरगाव, शिलाटणे , कार्ला ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते .