if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
मुळशी ( प्रतिनिधी ) देवाच्या आळंदी येथे मुळशी तालुका वारकरी संप्रदाय समाज मुळशी यांच्या वतीने गेली एकवीस वर्ष अखंड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी समुदाईक पारायण सोहळा अतिशय उत्सहात पार पडला.
मुळशी तालुक्यातील आजी माजी पदाधीकारी व वारकरी समाज मोठया संख्येने संपूर्ण पारायण व दीपप्रज्वलन प्रसंगी हजर होता.
या प्रसंगी आंबवणे येथील जेष्ठ समाजसेवक मा. नंदकुमार वाळंज व सौ. वत्सलाताई वाळंज यांच्या शुभ हस्ते 1151 दिव्यांची रास माऊली मंदिरात करून त्यांच्या शुभ हस्ते काल्याच्या कीर्तनाची आरती घेण्यात आली.
पंढरपूर येथील धर्मशाळे साठी मा शंकरभाऊ मांडेकर जिल्हा परिषद सदस्य, यांनी 5 लक्ष रुपयाची देणगी दिली. या प्रसंगी मुळशी चे मा. सभापती बाबासाहेब कंधारे , व माजी अध्यक्ष दत्ता भेगडे व मानकर महाराज उपस्थित होते. तसेच सी आय डी इन्स्पेक्टर श्री संजय येनपुरे यांनी माऊली मंदिरात भेट दिली.हभ प माऊली महाराज कदम यांचे सुस्राव्य काल्याचे कीर्तनाने पारायणा ची सांगता झाली.पडले.माऊली च्या मंदिरात पारायण करण्याचा हा मान फक्तमुळशीरानाचं मिळतो हे मुळशीकरांचे भाग्य म्हणावं लागेल.
मारुती महादेव धुमाळ,नरहरी माझीरे,चंद्रकांत पडळघरे,गणपत साठे, बबन शिंदे,सौ वत्सलाताई वाळंज, सीताराम पटेकर हे विश्वस्थ उपस्थित होते.
अध्यक्ष नारायण साठे, उपाध्यक्ष , दिंडी चालक, व्यवस्थापक, सल्लागार सदस्य,भजन कमिटी, मुळशी तालुका वारकरी संप्रदाय समाज यांच्या सहकार्यतून सात दिवसाचा हरी गजर व समुदाईक पारायण कार्यक्रम यशस्वी झाला.