लोणावळा (प्रतिनिधी) : स्वतंत्र्याच्या आमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जोशाबा संघटनेच्या वतीने खंडाळा,ठाकरवाडी येथे विविध शालेय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जोशाबा संघटनेचे अध्यक्ष अंकुशभाऊ चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त मुलांचा डान्स, देश भक्तीपर गिते व त्या शाळेतील माजी विद्यार्थ्यांची भाषणे झाली.तर काही स्थानिक महीलांनी आपापले मनोगत व्यक्त केले. तसेच अध्यक्षीय भाषणात अंकुशभाऊ चव्हाण यांनी सांगितले की देश प्रगती करतो आहे.
पण आपणच मागे आहे याचे कारण शिक्षण आहे ,म्हणूनच संघटनेच्या माध्येमातून आपली मुले शिक्षीत झाली पाहिजेत त्यांना शिक्षणाची गोडी लागली पाहिजेत अशा महात्मा फुले ,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या सन्मार्गाने आपल्या बांधवांना नेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याच बरोबर मावळातील सद्य स्थितीवर बोलताना चव्हाण बोलले की माजलेल्या वासनांध हालकटांची चमडी सोलण्याचे काम हे तरूंनानी केल पाहीजे ,आपल्या माताभगिनींनी आपल्या चिमूकलीवर लक्ष ठेवले पाहीजे ,जर कोणी आपल्या माता भगिणीकडे वाकड्या नजरेने पाहत आसेल तर तात्काळ पोलिस प्राशसनाशी संपर्क साधावा.
या वेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नामदेवजी राठोड,तालुका सदस्य लक्ष्मण राठोड,लोणावळा शहर अध्यक्ष जे के गरड आदि मान्यवर पदाधिकाऱ्यांसह स्थानिक महिला, नागरिक व लहान मुले मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन सौ साधना नाईक ,सौ सुर्यवंशी यांनी केले.कार्यक्रमाच्या शेवटी मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.