Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडडेंग्यू आजाराचा फैलाव रोखण्यासाठी शिवसेनेचे पालिकेला निवेदन !

डेंग्यू आजाराचा फैलाव रोखण्यासाठी शिवसेनेचे पालिकेला निवेदन !

शहरप्रमुख अभिषेक सुर्वे यांची कर्जत शहरात फवारणी व कचरा उचलण्याचे आवाहन..

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे )अतिरिक्त पाऊस व मध्येच पडत असलेल्या उन्हामुळे वातावरणात झालेल्या बदलामुळे कर्जत शहरात साठलेल्या पाण्यामुळे , अस्ताव्यस्त पडलेल्या कचऱ्यामुळे डासांची उत्पत्ती वाढत असून डेंग्यू या विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे . या कारणाने कर्जत शहरात डेंग्यूची रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूीवर आज दि.३ ऑक्टोंबर २०२२ रोजी शिवसेनेचे कर्जत शहरप्रमुख अभिषेक सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी कर्जत नगर परिषेदेला यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन करत कर्जतकरांची सुरक्षितता जपावी , अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल , असा क्रोध ईशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला.
कर्जत शिवसेनेचे शहर प्रमुख अभिषेक सुर्वे यांनी या गंभीर विषयावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात यावे व ज्या ठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम चालू आहे त्या ठिकाणी पाण्याचा साठा जास्त प्रमाणात असतो त्याही ठिकाणी डेंग्यू च्या अळीचे प्रमाण वाढत असून संपूर्ण कर्जत शहरात औषध फवारणी करण्यात यावी अश्या सुचना करण्यात आल्या .त्याचप्रमाणे फवारणीचे औषध कमी प्रतीचे असल्याने त्याचा परिणाम दिसत नसून याकामी तातडीने ज्यादा कुमक वापरून संपूर्ण शहरात फवारणी होणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे देखील म्हणणे आहे.
कर्जत शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असून पालिका प्रशासन गप्प असल्याने मुख्याधिकारी यांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी , असा संतापाचा सूर देखील नागरिकांमधून होत आहे.या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख अभिषेक सुर्वे, नगरसेवक संकेत भासे, शहर संघटक नदीम खान, शहर संपर्क प्रमूख अभिजित मुधोलकर, उपशहर प्रमूख मोहन भोईर, वैभव सुरावकर, दिनेश कडू, सल्लागार अशोक मोरे, अरुण मालुसरे, तेजस गायकर, भालचंद्र कर्णूक, जयदीप शिंदे, सचिन भोईर व इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page