(प्रतिनिधी- दत्तात्रय शेडगे) लोणावळा दि.14: विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्ताने शिवसेना शाखा रामनगर आणि ब्लड बँक पिंपरी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर काल रामनगर लोणावळा येथे पार पडले. लोणावळा शिवसेना महिला आघाडी प्रमुख तथा लोणावळा नगरपालिकेच्या नगरसेविका कल्पनाताई आखाडे यांच्या माध्यमातून हे रक्तदान शिबीर राबविण्यात आले.
देशात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढत असून कोरोना रुग्णही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांना रक्ताची कमतरता भासत असल्याने सामाजिक बांधिलकी जपत शिवसेना शाखा रामनगर आणि पिंपरी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून या रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली, यावेळी ५५ युवकांनी रक्तदान केले, शिवसेना शाखा रामनगर यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख मेहतर, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश केदारी, लोणावळा शिवसेना शहर प्रमुख बाळासाहेब फाटक, लोणावळा शिवसेना महिला आघाडी प्रमुख तथा नगरसेविका कल्पनाताई आखाडे, मावळ तालुका अवजड वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष नरेश काळवीट, नितीन शिंदे, भांगरवाडी शाखाप्रमुख संजय जाधव, शिवसैनिक धीरज घारे, दिलीप झोरे, विजय आखाडे ,जालिंदर शिंदे, देशमुख सर, योगेश खरात, संतोष आखाडे, गोविंद हिरवे बाळू सोनवणे, सुभाष दळवी, दीपक खारवे, आदीसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.