Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडडॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या आर पी आय पक्षाच्या वतीने बदलापूर घटनेचा कर्जतमध्ये...

डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या आर पी आय पक्षाच्या वतीने बदलापूर घटनेचा कर्जतमध्ये तीव्र निषेध !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरामध्ये आदर्श शाळेमधील चार वर्षाच्या २ चिमुकलींवर १३ ऑगस्ट २०२४ रोजी अत्याचाराची घटना घडली , ती अत्यंत दुर्दैवी असून यासंदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात जनप्रक्षोभ होत आहे . तर बदलापूर येथे देखील मंगळवार २० ऑगस्ट रोजी सर्वांनी रस्त्यावर उतरून रेल्वे बंद केली होती .आज कर्जतमध्ये डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने कर्जत पोलीस ठाण्यात तीव्र निषेध व्यक्त करून निवेदन देण्यात आले.

बदलापूर येथील आदर्श शाळेतील सफाई कामगार अक्षय शिंदे या नराधमाने ४ वर्षाच्या २ मुलींवर लैंगिक अत्याचार केले . हि घटना त्या चिमुरडीच्या घरी समजल्यावर शाळा प्रशासनाने दबाव आणल्याने पोलीस केस लवकर झाली नाही , तर हि पोलीस केस घेण्यास बदलापूर पोलीस स्टेशन ने देखील दिरंगाई केल्याने म्हणूनच या सर्वांवर देखील कडक कारवाई व्हावी , व नराधम अक्षय शिंदे यास फाशीची सजा व्हावी , अशी संतप्त मागणी आर पी आय च्या वतीने करण्यात आली आहे.

त्या बद्दल कर्जत पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन निषेध व्यक्त केला . यावेळी कर्जत तालुका अध्यक्ष प्रकाश गायकवाड , तालुका सचिव गौतम ढोले , संपर्क प्रमुख प्रविण रोकडे , युवा तालुका अध्यक्ष नरेश भाई गायकवाड , युवा सचिव रोहित सोनवणे , अमित जाधव , रोशन रोकडे , आकाश रोकडे , त्याचप्रमाणे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page