Thursday, July 3, 2025
Homeपुणेलोणावळाढेकू गावाजवळ सिमेंट ट्रकचा अपघात, चालकाचा जागीच मृत्यू...

ढेकू गावाजवळ सिमेंट ट्रकचा अपघात, चालकाचा जागीच मृत्यू…

लोणावळा : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोर घाटामधील ढेकू गावाजवळ किमी 36 येथे आज सकाळी 8.45 च्या सुमारास सिमेंटची पोती घेऊन जाणारी गाडी क्र.( MH 46 DM 7806 ) सुरक्षा भिंतीवरून खाली कोसळल्याने झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

अपघाताची माहिती समजताच आयआरबी पेट्रोलिंग , देवदूत यंत्रणा , बोरघाट महामार्ग पोलीस , लोकमान्यची टिम मृत्युंजय , अपघातग्रस्तांच्या मदतीला संस्थेचे कार्यकर्ते यांनी घटनास्थळी धाव घेत मयत चालकाला गाडीखालून बाहेर काढले.

- Advertisment -

You cannot copy content of this page