![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
तळेगाव दाभाडे : ( प्रतिनिधी )शहरात डीजे बंदी हटवावी, यासाठी येत्या गुरुवारी (७ ऑक्टोबर २०२५) सायंकाळी ६ वाजता ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरात शहरातील गणेश मंडळांची एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सर्व मंडळांनी उपस्थित राहून एकमताने पुढील भूमिका ठरवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
भेगडे तालीम मंडळाचे खजिनदार शुभम लांडे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, डीजे बंदीचा आदेश केवळ गणेशोत्सवापुरता मर्यादित नसून, तो सर्व प्रकारच्या मिरवणुकींवर लागू असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मात्र, अनेक राजकीय मिरवणुका डीजेसह निघताना दिसत असून त्यावर कुठलीही कारवाई होत नाही. मग फक्त हिंदू सणांमध्येच ही बंदी का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
शासनाने ७० डिसिबलपर्यंतच्या आवाजाची मर्यादा निश्चित केली आहे. मग नियमांचे पालन करून डीजे वाजवणे का बेकायदेशीर ठरवले जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत असून, गणेश मंडळांमध्ये या विषयावर संताप आणि संभ्रम निर्माण झाला आहे. यासंदर्भात मावळ तालुका डीजे असोसिएशनने देखील शासनाकडे डीजे वाजवण्यास परवानगी मिळावी, अशी विनंती केली आहे.