Friday, August 8, 2025
Homeपुणेतळेगावतळेगावातील पाण्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी प्रा. नितीन फाकटकर यांचे लाक्षणिक उपोषण..

तळेगावातील पाण्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी प्रा. नितीन फाकटकर यांचे लाक्षणिक उपोषण..

तळेगाव दाभाडे : ( प्रतिनिधी ) शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘रोखठोक मावळ’चे संपादक प्रा. नितीन ज्ञानेश्वर फाकटकर सोमवार, ११ ऑगस्ट २०२५ रोजी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत. हे उपोषण सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मारुती मंदिर चौकात होणार आहे.

तळेगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून अनियमित आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कमी दाबाने होणाऱ्या पाण्यामुळे रोजच्या जीवनात अडथळे निर्माण होत असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर प्रा. फाकटकर यांनी हा लाक्षणिक उपोषणाचा निर्णय घेतला असून, शहरातील अनेक नागरिकांनी त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.

प्रशासनाने वेळेवर योग्य उपाययोजना करून तळेगावकरांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी फाकटकर यांनी केली आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page