Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडताडवाडी व पोही येथील शेकडो आदिवासी समाज बांधवांचा " शिवसेना ठाकरे गटात...

ताडवाडी व पोही येथील शेकडो आदिवासी समाज बांधवांचा ” शिवसेना ठाकरे गटात ” जाहीर पक्षप्रवेश !

उपजिल्हा प्रमुख ” नितीन दादा सावंत ” यांच्या नेतृत्वाखाली जोरदार इंनकमिंग…

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) ” बूँद से गये , तो हौद से वापस आयेंगे ” , याचे चित्र सध्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात दिसून येत आहे . शिवसेना ठाकरे गटात सध्या मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू असल्याने कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गट अधिक मजबूत होत असताना उत्तर रायगडचे उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांच्या नेतृत्वावर असंख्य जण प्रभावित होत असतानाचे चित्र आहे . कर्जत तालुक्यातील ताडवाडी व पोही येथील शेकडो आदिवासी समाज बांधवांनी ठाकरे शिवसेनेत त्या प्रभागातील दिनेश भोईर व रामदास ठोंबरे यांच्या माध्यमातून पक्ष प्रवेश पार पडला असून हा पक्षप्रवेश कार्यक्रम कर्जत मधील शिवसेनेच्या मध्यवर्ती ” शिवालय ” कार्यालयात १५ सप्टेंबर २०२४ रोजी संपन्न झाला.

यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत , संपर्कप्रमुख भिवसेन बडेकर , संघटक बाबु घारे , महिला तालुका संघटिका करुणा बडेकर , माजी तालुकाप्रमुख राजाराम शेळके , पंढरीनाथ राऊत , सुरेश गोमारे, बाजीराव दळवी, गणेश मोडक, योगेश भोईर, दिनेश भोईर, रामदास ठोंबरे, माधव कोळंबे, प्रदीप देशमुख, कृष्णा जाधव, योगेश घोलप, आदिवासी समाजाचे नेते मालू निरगुडा आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने शिवसेना – युवा सेना – महिला आघाडी व आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

तर ताडवाडीचे नामदेव पादिर, सुरेश केवारी, विठ्ठल पादिर, पुंडलिक पादिर, नारायण पादिर तसेच पोहीचे केतन भोईर, भालचंद्र भोईर, चेतन म्हसे, गिरीश भोईर आदी प्रमुखांसह शेकडो आदिवासी समाज बांधवांनी ठाकरे गट शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गट शिवसेना दिवसेंदिवस अधिक मजबूत होतानाचे पाहायला मिळत असताना उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मदतीचा हात देत शिवसेना पक्ष मजबूत करीत असल्याचे पाहायला मिळत असून अनेक जण शिवसेनेत येत विरोधकांच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडता स्वईच्छेने शिवसेनेचे नेतृत्व स्वीकारत शिवसेना ( उ बा ठा ) पक्षात जाहीर प्रवेश करीत आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट शिवसेनेचा आमदार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम करू , असा निर्धार या पक्ष प्रवेशाच्या माध्यमातून पहावयास मिळत आहे. तर पक्षप्रवेश सोहळ्याच्या प्रसंगी प्रवेशकर्त्यांना संबोधताना उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत म्हणाले की, आपण टाकलेल्या कोणत्याही विश्वासाला तडा न जाऊ देता प्रामाणिकपणे मी आपली सदैव सेवा करीन, असे आश्वासन दिले.
- Advertisment -

You cannot copy content of this page