अष्ट दिशा : देशभरात आज घरगुती व व्यावसायिक एल पी जी गॅस सिलेंडरचे दर पुन्हा गडाडले असून आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 3:50 पैशांनी वाढ झाली तर, व्यावसायिक सिलेंडर 8 रुपयांनी महागला.
सध्या देशभरात महागाईने चांगलाच जोर धरला आहे , त्यामुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत . आज पुन्हा एकदा घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरांत वाढ झाली आहे . नव्या दरांनुसार आता संपूर्ण देशभरात घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमती 1000 पार पोहोचल्या आहेत . आज घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये 3 रुपये 50 पैशांची वाढ झाली आहे .
तर , व्यावसायिक गॅस सिलेंडर 8 रुपयांनी महागला आहे . देशाची राजधानी दिल्ली आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 14.2 किलोंचा घरगुती एलपीजी सिलेंडर 1003 रुपयांना मिळणार आहे . गेल्या एका वर्षात दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडर 809 रुपयांवरून 1003 रुपयांवर गेला आहे . आज , एलपीजीची किंमत कोलकातामध्ये 1029 रुपये आणि चेन्नईमध्ये 1018.5 रुपयांवर पोहोचली आहे . ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.