Wednesday, January 1, 2025
Homeपुणेदेहूरोडदेहूगावातील 17 वर्षीय युवतीची खाणीत उडी मारून आत्महत्या !

देहूगावातील 17 वर्षीय युवतीची खाणीत उडी मारून आत्महत्या !

देहूरोड : देहूगाव येथे खाणीत उडी घेत 17 वर्षीय युवतीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज शनिवारी दि .16 रोजी सकाळी उघडकीस आला.

सकाळी स्थानिकांना मुलीचा मृतदेह खाणीत तरंगताना दिसला . त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली . देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , देहूगाव येथील खाणीत उडी घेत 17 वर्षीय युवतीने आत्महत्या केली . मयत युवती शुक्रवारी दि .15 रोजी सकाळी आठपासून घरातून बेपत्ता होती.

याप्रकरणी तिच्या आईने देहुरोड पोलीस ठाण्यात आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.पोलिस शोध घेत असताना सकाळी स्थानिकांना मुलीचे प्रेत खाणीत तरंगताना दिसले . तिने आत्महत्या केल्याचे समोर आले . मात्र , आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.

- Advertisment -

You cannot copy content of this page