देहूरोड (प्रतिनिधी): देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे विविध कामांच्या आढावा संदर्भातील बैठक आमदार शेळके यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील पाणीपुरवठा, वाढीव टॅक्स आकारणी, पी.पी.अॅक्ट नोटीस, कामांची सद्यस्थिती, अतिक्रमण कारवाई आदि.विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.तसेच बाजारपेठ परिसरात अधिकाऱ्यांसमवेत जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत आमदार शेळके यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
किन्हई,चिंचोली, झेंडे मळा या भागातील पाण्याच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी लवकरात लवकर कामास सुरुवात करण्यात येणार आहे.बोर्ड हद्दीतील मिळकतींचे अवास्तव करपात्र मुल्य वाढ रद्द करण्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे यावेळी आश्वासित करण्यात आले.
यावेळी आमदार सुनील शेळके यांसमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार माने, प्रशासक कैलास पानसरे, राष्ट्रवादी काँग्रेस देहूरोड शहराध्यक्ष प्रविण झेंडे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहराध्यक्षा अरुणाताई पिंजण, मा.नगरसेवक हाजीमलंग मारीमुत्तु, शिवसेना शहरप्रमुख भरत नायडू,कृष्णा दाभोळे,बाळासाहेब जाधव, युवक अध्यक्ष आशिष बन्सल, तानाजी काळभोर,अतुल मराठे,किशोर गाथाडे आदी मान्यवर उपस्थित होते.