खोपोली- दत्तात्रय शेडगे
धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी ऑल इंडिया धनगर महासंघ ही संघटना महाराष्ट्रात कार्य करीत असून आज त्यांच्या वतीने रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलदार यांना धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी निवेदन दिले, हे निवेदन ऑल इंडिया धनगर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.
धनगर समाजावर आजही अन्याय होत असून दिवसेंदिवस मेंढपालावर हल्ले वाढत आहेत, धनगर समाजाचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत, याची सरकारला आठवण करून देण्यासाठी या संघटनेच्या वतीने रायगड जिल्हाधिकारी, तहसीलदार खालापूर, तहसील पेन, तहसिल कर्जत, यांना आज निवेदन देण्यात आले.
या निवेदनात धनगर समाजाची एसटी आरक्षनाची अमलबजावणी तात्काळ करा, धनगर समाजाला एसटी आरक्षण देऊनच मेगा भरती करावी, धनगर समाज प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीच्या स्वयंयोजनेबाबत सरकार गप्प का? त्यांची त्वरित अमलबजावणी करावी, विद्यार्थ्यांच्या जात पडताळणी प्रकरणी त्वरित आदेश द्यावेत, दूध उत्पादनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मेंढीला राष्ट्रीय पशुचा दर्जा मिळावा, अहिल्यादेवी होळकर व यशवंतराव होळकर यांचा इतिहास अभ्यासक्रमात समावेश करावा.
धनगर समाजातील मेंढपालाना चरण्यासाठी वने आरक्षित करून त्यांना पास उपलब्ध करून घ्यावा, या मागण्यांसाठीचे निवेदन आज देण्यात आले तर या आमच्या मागण्या सरकार पर्यंत पोहचवाव्या अशी मागणीही यावेळी केली.यावेळीं ऑल इंडिया धनगर समाज मीडिया अधिकारी महादेव कारंडे, ऑल इंडिया धनगर समाज युवक रायगड जिल्हाध्यक्ष किशोर झोरे,पेन तालुका धनगर समाज अध्यक्ष राजू आखाडे, गणेश गोरे झ लक्ष्मण मरगले आदी उपस्थित होते