Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडधर्मवीर संभाजी महाराज यांचा " राज्याभिषेक सोहळा दिन " कर्जतमध्ये उत्साहात साजरा...

धर्मवीर संभाजी महाराज यांचा ” राज्याभिषेक सोहळा दिन ” कर्जतमध्ये उत्साहात साजरा !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) महाराष्ट्रातील ” रायगड नगरी ” हि छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी राजे यांच्या ” पराक्रमी लढायाने व पद स्पर्शाने पावन झालेली भूमी ” असून शंभू राजांचे पहिले स्मारक कर्जतमध्ये स्थापन झाल्याने कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे व नगरसेवक संकेत भासे यांच्या संकल्पनेला मानाचा मुजरा असल्याचे जाहीर मत आज स्वराज्याचे पहिले युवराज ” धर्मवीर संभाजी महाराज ” यांचे राज्यभिषेक सोहळा दिनी कर्जतमध्ये सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत विभाग , श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान कर्जत , व शिवराज प्रतिष्ठान – नगरसेवक श्री संकेत भासे मित्र परिवार यांच्या वतीने शुक्रवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ रोजी ” धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक ” दहीवली – कर्जत येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिवव्याख्याते आकाश संजय घरडे यांचे ” श्री शंभू चरित्रावर ज्वलंत व्याख्यान ” यावेळी ते बोलत होते . यावेळी दिवसभरात ध्वजपुजन , श्री शंभू राज्याभिषेक सोहळा , आरती व रात्री ८ – ०० वा. शिवव्याख्याते आकाश संजय घरडे यांचे ” श्री शंभू चरित्रावर ज्वलंत व्याख्यान ” असे कार्यक्रम झाले .

यावेळी शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक श्री संकेत भासे मित्र परिवार चे अभिषेक सुर्वे , सायली शहासने , दिनेश कडू , सचिन खंडागळे , शिवभक्त मठपती त्याचप्रमाणे आयोजन निमंत्रक – सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत विभाग , श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान कर्जत , व शिवराज प्रतिष्ठान नगरसेवक श्री संकेत भासे मित्र परिवार चे पदाधिकारी , कार्यकर्ते , कर्जतकर मान्यवर महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी मान्यवरांच्या हस्ते आरती घेण्यात येवून श्री शंभू राजांचे पूजन करण्यात आले . यानिमित्ताने येथील स्मारक परिसर भगवेमय झाले होते.

यावेळी शिवव्याख्याते आकाश संजय घरडे यांचे श्री शंभू चरित्रावर ज्वलंत व्याख्यान पार पडले. त्यांनी शंभू राजे यांचे जीवनपट , त्यांचे शौर्य , ३१ वर्षांत त्यांनी केलेल्या लढाया , त्याचे कसब , व स्वराज्यासाठी दिलेले बलिदान यावर स्फूर्तिदायक व्याखान देवून स्मृती जागवल्या . यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी , कर्जतकर नागरिक उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page