Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडनांदेड मधील अक्षय भालेराव निर्घृण खून व मुंबई येथे बौद्ध विद्यार्थिनीवर झालेल्या...

नांदेड मधील अक्षय भालेराव निर्घृण खून व मुंबई येथे बौद्ध विद्यार्थिनीवर झालेल्या पाशवी बलात्कार प्रकरणी कर्जतमध्ये आरपीआय आक्रमक !

हिरामण गायकवाड यांच्या नेतत्त्वाखाली पोलीस स्टेशनला हल्ला बोल..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) नेहमीच अन्याय अत्याचार विरोधात आक्रमक भूमिका घेऊन सर्वांना न्याय देणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट ) आंदोलनात नेहमीच अग्रेसर असतो . कर्जत तालुका आरपीआय अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज शनिवार दिनांक १० जून २०२३ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) तालुका कर्जत यांच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील बोढार गावात विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याचा राग मनात धरून त्याच गावातील मनुवादी गावगुंडानी कट रचून निर्घृण नियोजित पद्धतीने अक्षय भालेराव या तरुणाची चाकूने भोसकून क्रूरतेने खून केला , तसेच अक्षयच्या आई – भावाला ही चाकूने दगडाने मारहांण केली , नंतर बौद्धवस्तीवर दगडफेक करत हल्ला करून दहशत निर्माण केली.
या नराधमांना फाशीची सजा व्हावी , त्याच प्रमाणे मुंबई चर्चगेट येथे सावित्रीबाई फुले वस्तीगृहात शिकणाऱ्या बौद्ध तरूणीवर वस्ती गृहाच्या सुरक्षा रक्षकाने बलात्कार करून क्रूरपणे हत्या केली . या घटना माणुसकीला काळिमा फसणाऱ्या असून अश्या जातीयवादी समाज कंटकांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी , अशी संतप्त मागणी घेवून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने कर्जत ता . अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कर्जत पोलीस स्टेशन येथे हल्ला बोल करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोल्हे यांना निवेदन देण्यात आले.

प्रथम भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यावर आरपीआय चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कर्जत पोलीस ठाण्यात गेले .यावेळी अशा घटनांना आवर घालावा , कायद्याचे भय कुणाला राहिले नाही का ? असा संतप्त सवाल करून अन्यथा राज्यभर या विरोधात तीव्र आंदोलन करू , असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांनी दिला.

यावेळी या संतप्त आंदोलनात अनंता खंडागळे (कर्जत तालुका सचिव रिपाई ) , प्रकाश गायकवाड ( कर्जत तालुका उपाध्यक्ष ) , जिवक गायकवाड ( कर्जत तालुका सहसचिव ) ,अमर जाधव (कर्जत तालुका युवक अध्यक्ष ), किशोर गायकवाड ( कर्जत तालुका उपाध्यक्ष तसेच नवनिर्वाचित सदस्य ग्रुप ग्रा. कोंदिवडे ) , अंकुश सुरवसे (कर्जत तालुका उपाध्यक्ष ) , विजय गायकवाड (कर्जत तालुका प्रसिद्धी प्रमुख ) , वर्षा चिकणे (कर्जत ता . महिला उपाध्यक्ष ) आणि सुनीता चव्हाण (कर्जत तालुका महिला संघटक ) आदी पदाधिकारी तसेच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व महिला वर्ग उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page