भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
कोरोना काळात कर्जत तालुक्यातील अनेक गावातील बस सेवा एस .टी. महामंडळ कर्जत आगाराने बंद केली होती.मात्र आत्ता कर्जत तालुक्यातील भरमसाठ विकेंड ऑफ ला व इतर दिवशीही पर्यटक व नागरिकांची वाढती संख्या बघून व कोरोना रुग्णांची संख्या बघता परिस्थिती आटोक्यात असल्याने कर्जत सांडशी या भागातील एस .टी. सेवा चालू करण्याची मागणी पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कोकण अध्यक्ष तथा बीड जिल्हा परिषद विभाग शिवसेनेचे कार्यकर्ते रमेश कदम यांनी आज कर्जत आगाराचे व्यवस्थापक यादव यांना निवेदनाद्वारे केली आहे.
सांडशी या ग्रामीण भागात बस सेवा नसल्याने या कोरोना काळात नागरिकांना इतर गाड्यांनी शासकीय व कौटुंबिक तसेच शेतीची कामे करण्यास तालुक्याच्या ठिकाणी येणे परवडत नाहीत.कोरोनाची परिस्थिती आत्ता आटोक्यात आली असून तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांना बंदी नसताना आमच्यावर बस सेवा बंद करून अन्याय का करता ,असा सवाल रमेश कदम यांनी उपस्थित केला आहे.
नागरिकांची होणारी गैरसोय बघता म्हणूनच कर्जत सांडशी या ग्रामीण भागातील बस सेवा त्वरित चालू करण्याची मागणी त्यांनी केली असून जर आठ दिवसांत ही एस.टी. सेवा चालू झाली नाही ,तर पोलीस मित्र संघटना व बीड जिल्हा परिषद विभाग शिवसेना तसेच नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडणार ,असा ईशारा एस .टी .आगार कर्जत व्यवस्थापक यादव यांना निवेदनाद्वारे पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कोकण अध्यक्ष व शिवसेनेचे रमेश कदम यांनी दिला आहे.