Friday, October 18, 2024
Homeपुणेमावळनानोली फाट्यावर कंटेनर व दुचाकीचा अपघात बाप लेकीचा मृत्यू, दोन जखमी…

नानोली फाट्यावर कंटेनर व दुचाकीचा अपघात बाप लेकीचा मृत्यू, दोन जखमी…

मावळ (प्रतिनिधी):भरधाव कंटेनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकी वरील दोघेजण जखमी झाले तर यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे.मृत्यू मध्ये एका चार वर्षीय बालिकेचा समावेश आहे.हा अपघात शनिवार दि. 30 रोजी दुपारी 04:00 वाजण्याच्या सुमारास तळेगाव एमआयडीसी परिसरातील नानोली फाट्याजवळ घडला.
सुनील वाघमारे (वय 25), आर्या सुनील वाघमारे (वय 4) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत तर गणेश जाधव, परवीन वाघमारे (सर्व रा. टाकवे बुद्रुक, ता. मावळ) हे दोघेजण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील, आर्या, गणेश आणि परवीन असे चौघेजण दुचाकीवरून जात होते, नानोली फाट्याजवळ आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून एका कंटेनरने जोरदार धडक दिली. धडक बसल्यानंतर दुचाकी घसरून चौघेही रस्त्यावर पडले. भरधाव कंटेनरने त्यातील सुनील आणि आर्या या दोघांना चिरडले.
यामध्ये गंभीर जखमी होऊन सुनील आणि आर्या या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर गणेश आणि परवीन हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात झाल्यानंतर कंटेनर चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page