कामशेत (प्रतिनिधी) : कामशेत येथील पंडित नेहरू विद्यालयाबाहेर मुलींशी गैरवर्तन करणाऱ्या रोडरोमियोंना चाप बसविण्यासाठी कामशेत पोलिसांकडून गस्त घालण्यात येत आहे.
कामशेत येथील पंडित नेहरू विद्यालयाबाहेर मुलींशी गैरवर्तन करणाऱ्या रोडरोमियोंना खाकीचा हिसका दाखवण्यासाठी कामशेत पोलिसांनी गस्त घालण्याची मोहीम हाती घेतली आहे. पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींच्या संरक्षणासाठी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विद्यालयापर्यंत कामशेत पोलिसांकडून शाळा भरते वेळी व सुटते वेळी शाळा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे.
पंडित नेहरू विद्यालय व ज्यु . कॉलेज येथे दुपारी कॉलेज सुटल्यावर कॉलेजचे विद्यार्थी घोळका करतात तसेच त्या घोळक्याचा फायदा घेत इतर रोड रोमियोंकडून मुलींची छेडछाड करणे , आपापसात भांडणे करणे , मारामारी करणे , वादविवाद तसेच विनापरवाना मोटारसायकल वापरणे, त्यात स्टंट करणे आदी प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असून त्यांना आळा घालण्यासाठी आता कामशेत पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.
याबाबत कॉलेजचे प्राचार्य एस. आर.धावडे यांनी पोलीस प्रशासनास कळविले होते. याचीच गांभीर्याने दखल घेत शाळा परिसरात कामशेत पोलीस स्टेशन कडून पोलीसबंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
तसेच या रोडरोमियोंना कायमचा चाप बसेल यासाठी पोलीस निरीक्षक संजय जगताप , सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार व कामशेत पोलीस स्टेशन कडून ही उपाय योजना राबविण्यात येणार आहे.त्यामुळे रोड रोमिंयोंनी सावध रहा हिरोगिरी करायला जाल, तर येसाल पोलीस कचाट्यात.