Friday, July 4, 2025
Homeमहाराष्ट्ररायगड" पंतप्रधान आवास योजने " अंतर्गत वावळोली येथे घरकुल कामांचे " भूमिपूजन...

” पंतप्रधान आवास योजने ” अंतर्गत वावळोली येथे घरकुल कामांचे ” भूमिपूजन ” संपन्न !

कार्यसम्राट ” आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांचा पुढाकार…

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) ग्रामीण भागात प्रत्येक गरजू व्यक्तीला रहाण्यासाठी घर असावे , असा उद्दात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांची संकल्पना असल्याने याची खऱ्या अर्थाने सुरुवात कर्जत तालुक्यातील वावळोली येथे पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुलांचे भूमिपूजन कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या हस्ते संपन्न झाले . यावेळी हा कार्यक्रम वावळोली ग्रामपंचायती अंतर्गत कुंडलज येथे पार पडला . या कार्यक्रमाचे भूमिपूजन आमदार महेंद्र शेठ सदाशिव थोरवे यांच्या शुभहस्ते आणि मा. सुशांत पाटील ( गटविकास अधिकारी, पंचायत समिती कर्जत ) यांच्या उपस्थितीत पार पडले.

या कार्यक्रमात बोलताना आमदार महेंद्र शेठ थोरवे म्हणाले की , प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरकुलांचा लाभ अधिकाधिक गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला . भारत सरकारने २०१५ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली असून , २०२२ पर्यंत सर्व गरजू कुटुंबांना हक्काचे घर मिळावे हा योजनेचा उद्देश आहे.
महाराष्ट्रात २९ लाख घरकुलांचे उद्दिष्ट असून रायगड जिल्ह्यात २२ हजार घरकुल मंजूर झाली आहेत.विशेषतः कर्जत तालुक्यात १८३० घरकुल मंजूर झाली असून, हा तालुका रायगड जिल्ह्यात घरकुल मंजुरीत ” दुसऱ्या क्रमांकावर ” असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .यावेळी त्यांनी घरकुल लाभार्थ्यांना वेळेत घर बांधण्याचे आवाहन केले. तसेच, लाभार्थ्यांनी मिळालेला निधी फक्त घर बांधण्यासाठी वापरावा आणि संबंधित अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना वेळेवर हप्ते मिळतील याची दक्षता घ्यावी, असा मोलाचा सल्ला दिला.

या कार्यक्रम प्रसंगी श्री. एकनाथ गणपत भगत – सरपंच , सौ. विद्या विनायक खानविलकर – उपसरपंच ,श्री. धनंजय बळीराम देशमुख – ग्रामपंचायत अधिकारी , श्री. हर्षद विचारे – माजी सरपंच , मोरेश्वर भगत – ग्रामपंचायत सदस्य , संतोष हीलम – ग्रामपंचायत सदस्य , हरिश्चंद्र कांबेरे , दीपक घरत , निलेश थोरवे , विश्वनाथ घरत , चंद्रशेखर चंचे , विनायक खानविलकर , उत्तम ठोंबरे , उत्तम घरत , तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वावलोळी ग्रामपंचायत व कर्जत पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली. या माध्यमातून आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी ” आश्वासनांची स्वप्नपूर्ती ” करत कर्जत तालुक्यातील अनेक कुटुंबांना ” हक्काचे घर ” मिळण्याचा मार्ग ” सुकर ” केला आहे .
- Advertisment -

You cannot copy content of this page