Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडपक्ष विरोधी भूमिका घेणाऱ्या मनोज गायकवाड यांची आरपीआय पक्षातून हकालपट्टी...

पक्ष विरोधी भूमिका घेणाऱ्या मनोज गायकवाड यांची आरपीआय पक्षातून हकालपट्टी…

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे )रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री मा. रामदासजी आठवले साहेब यांच्या विरोधात व्हाट्स अप सोशल मीडियावर त्यांची प्रतिमा मलिन होण्याजोगे खालच्या भाषेत नेरळ भागातील महेश आढाव याने भाष्य केले होते , त्यावेळी त्यांच्या विरोधात आरपीआय पदाधिकारी व कार्यकर्ते नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी गेले असताना पक्षातील एक कार्यकर्ता त्याला वाचविण्यासाठी बैठकीचे आयोजन करत होता , तर कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीश भाई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तालुक्यात गाव भेटी दौरा असताना हाच कार्यकर्ता पक्षविरोधी कारवाया करताना आढळून आला.
तसेच दिनांक १२ ऑक्टोबर २०२२ रोजी केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या केंद्रीय योजनांचा लोककल्याणकारी कार्यक्रम यशवंतराव सभागृह , मुंबई येथे आयोजित केला असता हे जाणूनही पक्ष नेतृत्व विरोधी भूमिका घेऊन फेसबुक प्रकरणासाठी कर्जत डी वाय एस पी येथे भेट आयोजित करणाऱ्या व पक्षात दुफळी करणाऱ्या त्या कार्यकर्त्यांसाठी तालुक्याच्या वतीने आरपीआय कर्जत ता. अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांनी एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते.त्यावेळी झालेल्या चर्चेत कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीश भाई गायकवाड तसेच जिल्हा संपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांनी कार्यकर्त्यांच्या आलेल्या तक्रारींचे स्वरूप पाहून आरपीआय चे कर्जत तालुका माजी सचिव मनोज गायकवाड ( वदप ) यांस आरपीआय पक्षातून पक्ष विरोधी कारवाया करणे , पक्ष नेतृत्व राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या विरोधात भूमिका घेणे , पक्षाची प्रतिमा मलिन करणे , पक्षातील कुठल्याच कार्यक्रम , आंदोलनमध्ये उपस्थित न रहाणे , या त्यांच्या भूमिकेमुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे , असे पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले.
गेली अनेक दिवसांपासून कर्जत तालुक्यात आरपीआय पक्षात दोन गट पडलेले दिसत होते .पक्ष नेतृत्वाने पक्ष विरोधी कारवाया करणारे यांना पक्षात येऊन कामे करा , असे आवाहन देखील करण्यात आले होते , मात्र त्याचे पडसाद आता उमटले असून त्याचा पहिला बळी मनोज गायकवाड यांची आरपीआय पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे . तर यापुढेही कुणी पक्ष विरोधी कारवाया केल्या , पक्ष विरोधात भूमिका घेतली तर त्यांचीही गय केली जाणार नाही , त्यांच्यावर देखील कारवाई होईल , असे कर्जत ता.अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांनी जाहीर केले आहे.
आज दिनांक ०१ नोव्हेंबर २०२२ रोजी सिग्नेचर अपार्टमेंट – हालीवली येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जत तालुका कार्यकरणीची व महिला आघाडी ची मिटिंग आयोजित केली होती , यावेळी कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड , महिला कर्जत ता.अध्यक्ष अलका सोनावणे ,अमर जाधव ता. युवक अध्यक्ष , प्रकाश गायकवाड ता. उपाध्यक्ष , प्रफुल्ल ढाले ता. उपाध्यक्ष , उज्ज्वला सोनावणे कर्जत तालुका महिला सचिव , वैशाली भोसले कर्जत शहर महिला अध्यक्ष , सुरेखा कांबळे नेरळ शहर महिला अध्यक्ष , जीवक गायकवाड सहसचिव कर्जत तालुका , विकास गायकवाड ता. सहसचिव , संदीप गायकवाड जिल्हा परिषद अध्यक्ष उमरोली प्रभाग , प्रवीण गायकवाड उमरोली पंचायत समिती अध्यक्ष , निशांत जाधव युवा कार्यकर्ता कर्जत , अक्षता गायकवाड कर्जत तालुका संघटक , सोनाली गायकवाड ता.उपाध्यक्ष , वर्षा उबाळे ता.कार्याध्यक्ष , वर्षा लादे ता.सेक्रेटरी वर्षा चिकणे ता.संघटक , अनंता खंडागळे ता. महासचिव , दिनेश गायकवाड ता.कार्याध्यक्ष , दीपक गायकवाड ता.उपाध्यक्ष , अंकुश सुरवसे ता.उपाध्यक्ष , भालचंद्र गायकवाड ता.संघटक , दिनेश आढाव नेरळ शहर अध्यक्ष , जगदीश शिंदे ता.उपाध्यक्ष , किशोर गायकवाड ता.उपाध्यक्ष , अमोल जाधव कडाव पंचायत समिती अध्यक्ष , बाळा चंदनशिवे ता. संघटक , राजु आढाव नेरळ शहर सचिव , नितीन गायकवाड , नेरळ शहर युवक अध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page