Thursday, July 17, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडपनवेल पळस्पे पोलीस चौकीजवळ एस टी बस उलटून अपघात दहा प्रवासी व...

पनवेल पळस्पे पोलीस चौकीजवळ एस टी बस उलटून अपघात दहा प्रवासी व चालक जखमी…

पनवेल : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ठाणे – सांगली ही बस क्रमांक MH 40 N 9164 ही रस्त्याच्या कडेला उलटून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात चालकासह 10 प्रवासी जखमीझाले असून इतर प्रवासी सुखरूप बचावले आहेत.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस 46 प्रवासी घेऊन ठाण्याहून सांगली कडे रवाना झाली. दि.22 रोजी दुपारी 12 च्या सुमारास पनवेल तालुका हद्दीत अपघात महामार्ग पोलीस केंद्र , पळस्पे चौकीजवळ हा अपघात झाला आहे.ही बस रस्त्याच्या कडेला उलटल्याने बसच्या चालकासह 10 प्रवासी जखमी झाले. सुदैवाने इतर प्रवासी सुखरूप बचावले आहेत.
पोलिस आणि बचाव यंत्रणांनी तात्काळ घटनास्थळी मदतिसाठी धाव घेतली. व प्रवाशांना बाहेर काढले.
- Advertisment -

You cannot copy content of this page