Wednesday, January 1, 2025
Homeपुणेपरिक्षा Home Assignment Bassed Examination पद्धतीने घ्याव्यात:-राष्ट्रवादी युवक काँग्रेस..

परिक्षा Home Assignment Bassed Examination पद्धतीने घ्याव्यात:-राष्ट्रवादी युवक काँग्रेस..

अष्ट दिशा, वृत्तसेवा, प्रतिनिधी, संतोष पवार

पुणे:दि 08 न्यायालयाच्या निकालाचा आदर राखत अंतिम सत्रातील विध्यार्थ्यांच्या परिक्षा या बहुपर्यायी/वस्तुनिष्ठ(MCQ) पद्धतीने न घेता मध्य प्रदेश, झारखंड, वाराणसी विधापीठ प्रमाणे Home Assignment Bassed Examination घेऊन विद्यार्थ्यांवर आलेले दडपण लक्षात घेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू नितीन करमाळकर यांच्याशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा सदस्य तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय अभिषेक दादा बोके यांनी चर्चा केली.

त्यावर कुलगुरूंनी सकारात्मक विचार करून निर्णय घेऊ असे सांगितले त्यांनतर राष्ट्रवादी विधार्थी काँग्रेस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कडून योग्य निर्णय न झाल्यास अमरण उपोषणाचा पवित्रा घेतला जाईल असा इशारा सोमनाथ लोहार यांच्या कडून दिला गेला.

- Advertisment -

You cannot copy content of this page