Friday, October 18, 2024
Homeपुणेमावळपवन मावळातील येळसे गावात शिवसेवा प्रतिष्ठानचे वृक्षारोपण व वृक्ष दत्तक अभियान यशस्वी..

पवन मावळातील येळसे गावात शिवसेवा प्रतिष्ठानचे वृक्षारोपण व वृक्ष दत्तक अभियान यशस्वी..

मवाळ : ( प्रतिनिधी: श्रावणी कामत ) रविवार, दिनांक 23 जून 2024 रोजी शिवसेवा प्रतिष्ठानवर प्रेम करणारे वृक्षप्रेमी सकाळी नऊ वाजता पवन मावळातील येळसे या गावी एकत्र जमले. पुणे, मुंबई तसेच मावळ तालुक्यातील अनेक कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले.
येळसे गावातील ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी देखील या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. श्री नवनाथ ठाकर यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते. वृक्षारोपणासाठी योग्य जागा शोधून त्या ठिकाणी खड्डे घेण्याचे काम आधीच करून ठेवले होते. तसेच सर्व पाहुण्यांसाठी चहा-नाश्त्याची व्यवस्था गावकऱ्यांनी आनंदाने व अत्यंत चांगल्या पद्धतीने केली होती.
शिवसेवा प्रतिष्ठानचा हा दरवर्षीचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम पावसाळ्याचे आगमन लक्षात घेऊन पवन मावळात आयोजित करण्यात आला होता. वृक्षारोपणासाठी शिवसेवा प्रतिष्ठानने अत्यंत काळजीपूर्वक झाडांची निवड केली होती. यामध्ये आंबा, जांभळ, फणस, जाम, कडुलिंब, बेल, चिंच, वड, पिंपळ या देशी झाडांची प्रामुख्याने निवड केली. या झाडांवर वेगवेगळे पक्षी आनंदाने घरटी करतात व नांदतात, तसेच त्यांना अन्न मिळते.
या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. मुंबईहून ॲड. ऋतुजा आंबेकर, पुण्याहून श्री मिलिंद भणगे, लोणावळ्यातून ॲड संजय वांद्रे, माननीय दत्तात्रय येवले, मनोज लौळकर तसेच शिवसेवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते व संचालक सहभागी झाले होते. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात पार पडला. सर्व ग्रामस्थांनी अत्यंत काळजीने झाडांचे संवर्धन करू असे सांगितले.
लोणावळ्यातील कारखानदार राजीव देशपांडे यांच्या सहकार्याने येळसे गावातील जिल्हा परिषद शाळेचे कंपाउंडचे काम शिवसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले. शिवसेवा प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचे गावकऱ्यांच्या वतीने आभार मानण्यात आले.
शिवसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री धनंजय चंद्रात्रे, प्रमोद देशपांडे सर, राजेश कामठे, राजेश येवले, भगवान गायकवाड व शिवसेवा प्रतिष्ठानचे सर्व सभासद यांनी अथक परिश्रम घेतले.
- Advertisment -

You cannot copy content of this page