if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा : मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या बॅकवॉटरमध्ये चार डिसेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास बोट उलटून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत निष्काळजीपणाचा ठपका ठेवत बंगला मालक आणि बोट मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत तुषार अहिरे यांच्या नातेवाईकांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिली.
भुसावळ येथील तुषार अहिरे आणि मयूर भारसाके हे चार डिसेंबर रोजी त्यांच्या मित्रांसोबत मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. त्यांनी लेक इस्केप व्हिला या बंगल्यात थांबण्याची व्यवस्था केली होती. हा बंगला पवना धरणाच्या बॅकवॉटरच्या किनाऱ्यावर आहे, जिथून थेट पाण्यात उतरण्यासाठी रस्ता आहे.
बंगल्याजवळील बोटीचा वापर करून तुषार, मयूर आणि त्यांचा मित्र पाण्यावर फेरफटका मारायला गेले होते. मात्र, बोट पलटी झाल्याने तुषार आणि मयूर पाण्यात पडले. पाण्याचा अंदाज न आल्याने ते बाहेर येऊ शकले नाहीत, आणि यात दोघांचाही मृत्यू झाला.
मयत तरुणांच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीवरून लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बंगला मालक व बोट मालकाविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सांगितले.