Thursday, September 19, 2024
Homeपुणेलोणावळापांडुरंग आम्हाला आमच्या ग्राहकांमध्ये दिसतो,ओमकार डोसा सेंटर चे मालक कृष्णा साबळे…

पांडुरंग आम्हाला आमच्या ग्राहकांमध्ये दिसतो,ओमकार डोसा सेंटर चे मालक कृष्णा साबळे…

लोणावळा (प्रतिनिधी):आषाढी एकादशी निमित्त लोणावळ्यातील ओमकार मसाला डोसा सेंटरचे मालक कृष्णा वसंत साबळे यांच्या वतीने दुकानात येणाऱ्या सर्व ग्राहकांना गोपीचंदनाचा टिळा लावत वारकरी संप्रदायाची टोपी व चहाचे मोफत वाटप करण्यात आले.
भक्तांचा सांभाळ करण्यासाठी 28 युगे कंबरेवर हात ठेवून उभा असलेला पांडुरंग आम्हाला आमच्या ग्राहकांमध्ये दिसतो असे म्हणत भक्तीभाव जोपासत हा अनोखा उपक्रम जयचंद चौक येथे राबविण्यात आला.
या उपक्रमात कृष्णा साबळे यांच्या समवेत नवनाथ मालुसरे, प्रकाशभाऊ मोरे, सोमनाथ ढाकोळ, दिपालीताई मोरे, संजयभाऊ देवकर, अमोल हटकर, सचिन सावंत, रोहन लोखंडे, बुवा शंकर निपाणे, बाळु आंबेकर व इतर मित्र मंडळी सहभागी झाले होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page