Tuesday, December 24, 2024
Homeपुणेलोणावळापुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने लोणावळ्यात महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता…

पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने लोणावळ्यात महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता…

लोणावळा : वारसा स्वच्छतेचा मावळा शिवरायांचा पर्व 2 या मोहिमे अंतर्गत पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने लोणावळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर व सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता करण्यात आली.
पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस आयोजित, वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा, गड किल्ले स्वच्छता अभियान आणि इंद्रायणी नदी व महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वछता पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोणावला उप विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आय पी एस सत्यसाई कार्तिक यांच्या संकल्पनेतून सदर स्वच्छता अभियानाला छत्रपती शिवाजी महाराज चौक, लोणावळा येथून सुरुवात करण्यात आली.
यावेळी लोणावळा नगरपरिषद,आय एन एस शिवाजी, शिवदुर्ग मित्र, सिहंगड महाविद्यालय, डी वाय पाटील विद्यालय, लोणावळ्यातील पत्रकार, वडगांवचे पोलीस निरीक्षक कुमार कदम, कामशेतचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सीताराम डूबल, लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे, उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी ,पोलीस कर्मचारी, लोणावला नगरपरिषद कर्मचारी सामाजिक संस्था आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्यसाई कार्तिक आणि मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी अभियानाबद्दल माहिती देताना,इंद्रायणी नदीची स्वच्छता ही शासनाच्या योजने अंतर्गत नियमित केली जाईल, तसेच लोणावळ्यातील 12 प्रभागातील दर दिवशी एक याप्रमाणे संपूर्ण लोणावळा शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात येईल असे सांगितले.
- Advertisment -

You cannot copy content of this page