मावळ दि. 3: पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कासवांची तस्करी करणाऱ्यास केली अटक.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक फरारी आरोपीचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांना गोपनीय बतमीदारामार्फत माहिती मिळाली की पुणे-मुंबई रोडवर कान्हे फाटा येथे एक इसम कासवांची तस्करी करून विक्री करण्यासाठी येणार आहे .सदर गोपनीय माहितीच्या आधारे कान्हे फाटा येथे सापळा लावून कासवांच्या विक्रीसाठी आलेल्या राकेश आबाजी पवार (वय 37 रा.कामशेत ता.मावळ जि. पुणे) याला ताब्यात घेतले.त्याच्याकडे एका बकेटमध्ये 12 नख्यांची 2 कासव ,असे एकूण 80,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपीस मुद्देमाला सहीत पुढील कारवाईसाठी वनपरिक्षेत्र विभाग वडगाव मावळ यांच्या ताब्यात देण्यात आले आहे .
सदर ची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके ,पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे ,ए एस आय प्रकाश वाघमारे, कॉन्स्टेबल प्राण येवले,चालक काशिनाथ राजापुरे
यांनी केली आहे.
काही वर्षांपूर्वी काही भोंदू बाबांनी कासवापासून पैशांचा पाऊस पाडण्याचे प्रकार मावळात घडत असल्याचे वृत्त कानावर पडत होते आताही या कासवांच्या तस्करी मागे काय उद्देश आहे याचा कसून तपास करणे गरजेचे आहे.