लोणावळा (प्रतिनिधी):पुण्यात भरदिवसा तरुणीला कोयता हल्ल्यातून वाचविणारे जिगरबाज लेशपाल जवळगे व हर्षद पाटील यांचा लोणावळ्यात शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
मागील आठवड्यात भरदिवसा पुण्यात एका तरुणीवर कोयता हल्ला करण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला. तरुणी रस्त्याने वाचवा म्हणत पळत होती व माथेफिरु तरुण हातात कोयता घेऊन मुलीवर वार करण्याचा प्रयत्न करत असताना लेशपाल जवळगे व हर्षद पाटील या तरुणांनी क्षणाचाही विलंब न करत सदर तरुणाला पकडत कोयत्याचे वार स्वतःवर घेत मुलीला वाचविले. या जिगरबाज तरुणांचा लोणावळ्यात शिवसेनेच्या वतीने माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, महेश खराडे, सौरभ कडू, यश खराडे, ओमकार खराडे, ज्येष्ठ शिवसैनिक दिलीप गालिंदे, प्रतिक गालिंदे, गौरव नवले, जय गालिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.