if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) राज्यात फूट पडायच्या अगोदरच कर्जत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुभंगलेल्या अवस्थेत होता , येथे रसद पुरविणाऱ्याना मान – सन्मान मिळत होता . या मतदार संघात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झाड वाढविण्याचे काम करत आलो , मात्र बाहेरून कुणीतरी येवून हे झाड ओरबडण्याचे काम करत असेल तर हि बाब दुःखदायक व दुर्दैवी आहे , असा खरपूस समाचार फुटून गेलेल्या हितचिंतकांचां घेवून आपल्याकडे ” सत्तेचा बाप ” आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब असल्याने येणाऱ्या काळात या तालुक्यात जोमाने कामाला लागा , मी तुमच्या सदैव सोबत असेन, अशी ग्वाही आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आयोजित केलेल्या सभेत माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांनी जमलेल्या तमाम कार्यकर्त्यांना दिली.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेली उभी फूट , व कर्जत तालुक्यात त्या अगोदरच दुभंगलेल्या पक्षाची पुन्हा उभारणी करण्यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली , माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांच्या मार्गदर्शनाने व नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष सुरेश दादा टोकरे यांनी निमंत्रित केलेल्या सभेस ” संकल्प निवास ” या सभागृहात ” न भूतो न भविष्यती अशी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे आज हि कार्यकर्ते माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत , याचेच हे दृश्य होते . त्यामुळे विरोधक व राष्ट्रवादी सोडून गेलेले हितचिंतकांच्या पायाखालची वाळू नक्कीच सरकली असेल , अशीच चर्चा येथे होत होती . सुरेशभाऊ लाड पुढे म्हणाले की , आम्ही या तालुक्यात सन १९७७ पासून आपल्या सोबत काम करत आहोत. आजपर्यंत सर्व निवडणुकीत यश कसे मिळेल याकडेच लक्ष दिले.
काम करत गेलो , म्हणूनच पक्षाने संधी दिली व आम्ही आमदार झालो , पूर्वी आम्ही तालुका अध्यक्ष असताना ग्रामीण भागातील निवडणुकीत कचेरीच्या बाहेर टेबल टाकून बसलो व फॉर्म भरले ,व जनसंपर्क वाढवला , म्हणूनच ज्यांचे सहकार्य आजपर्यंत लाभले त्यांचे आभार त्यांनी प्रकट केले , मात्र येथे रसद पुरविणाऱ्याना मान सन्मान मिळत असेल तर हि दुःखाची बाब आहे , यावर प्रकाश टाकला , तर शांत पद्धतीने आपली नौका तीरावर कशी न्यायची याचे भान होते , यासाठी कुठलीच दादागिरी केली नाही , घरात क्लेश होत असतील तर वेगळं होणेच गरजेचं , असे मार्गदर्शन सुरेश भाऊ लाड यांनी केले. ८३ वर्षाचे पवार साहेब आजही पक्ष बांधणीसाठी फिरत आहेत ,अनेक मान्यवर पक्ष सोडून गेले ,आताची फूट काही नवीन नाही , कर्जत तालुक्यातील सर्व घडामोडी मी वरिष्ठ पदाधिकारी यांच्या कानावर घातली होती.
मात्र त्यांनी हि वेळीच लक्ष दिले नाही , आपल्याकडे ” सत्तेचा बाप ” पवार साहेब आहेत , फुटलेले ९ मंत्री पवार साहेबांना भेटले , आम्हाला पदरात घ्या अशी विनवणी केली , मात्र सुप्रिया ताई सुळे यांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली आहे व मा. राजिपचे अध्यक्ष सुरेश दादा टोकरे यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष बनविले.
आज तालुक्यातील प्रामाणिक कार्यकर्ता आपल्या पाठीशी आहे , पक्षात जे थांबलेले आहेत त्यांची पदे तशीच राहतील , पण जे सोडून गेलेत त्यांच्या जागी नवीन पदे भरण्यात येतील , टोकरे यांच्याकडे पवार साहेबांनी महत्वाची कामगिरी सोपवली आहे , म्हणून येणाऱ्या काळात सर्वांनी जोमाने काम करून बूथ कमिटी तयार करा , बूथ कमिटी महत्वाची आहे , त्यांना ओळखपत्र द्यावी , त्यांच्यामुळेच पक्ष बळकट होतो , अशी सूचना त्यांनी मांडली . पुन्हा जोमाने काम करू , मी तुमच्या सदैव सोबत आहे , अशी ग्वाही सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी दिली.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश दादा टोकरे यांनी पवार साहेबांच्या आशीर्वादाने व भाऊंच्या मार्गदर्शनाखाली मला मिळालेले पद मी योग्य काम करून सार्थकी ठरवेन , असा विश्वास दिला . तर ज्येष्ठ नेते तानाजी चव्हाण यांनी कुठलेच सरकार महाराष्ट्रात टिकून द्यायचे नाही असे केंद्रातील मोदी सरकारचे धोरण असल्याने पूर्वी शिवसेना नंतर राष्ट्रवादी त्यांनी फोडली आहे , असा आरोप केला . जलसिंचन , सहकार घोटाळा मोदी बाहेर काढणार म्हणून ४ दिवसात राष्ट्रवादी फुटली , भाऊंच्या २०१९ ला पराभवाला अनेक जण कारणीभूत असल्याचे देखील त्यांनी सांगितले . गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ कार्यक्रम पत्रिकेत भाऊंचे नाव वगळले , यासाठी पक्ष श्रेष्ठींचा आशीर्वाद होता का ,असे खासदार तटकरे यांचे नाव न घेता त्यांनी टिका केली, तर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता शिवसेना शिंदे गटाचे काम करेल का ? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
तर राजेश लाड यांनी राज्याच्या नेतृत्वाने आपल्या सोईनुसार कार्यकर्त्यांकडे पाठ फिरवली ,मात्र नेतृत्व हे कार्यकर्त्यांवर अवलंबून असते , असा तटकरे यांच्यावर आरोप करत १९९९ पासूनच कार्यकर्ता हा भाऊंच्या पाठीशी ठाम आहे , यावर त्यांनी प्रकाश टाकला . ८३ व्या वयात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा पवार साहेबांवर अशी परिस्थिती आणली ,याचा जाब पक्ष सोडून जाणाऱ्यांना विचारण्याची वेळ आल्याची त्यांनी म्हटले.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार सुरेशभाऊ लाड, जिल्हाध्यक्ष सुरेश दादा टोकरे , ज्येष्ठ नेते तानाजी चव्हाण , माधवीताई जोशी , मा. जि.प. सदस्या रेखा दिसले , रणजित जैन , राम राणे , ठमके , मा. उपनगराध्यक्ष लालधारी पाल , जगदीश ठाकरे , नंदू लाड , नगरसेवक शरदभाऊ लाड , मा. नगराध्यक्ष राजेश लाड , मा. नगराध्यक्षा रजनीताई गायकवाड , युवती नेत्या प्रतिक्षा लाड , नगरसेविका पुष्पा दगडे , मधुरा चंदन , सुवर्णा निलधे , युवा ता. अध्यक्ष सागर शेळके , मा. नगरसेवक अशोक राऊत , शंकर भुसारी ,जयंत नझे , आप्पा मंडावळे, तहसीन भाई , त्याचप्रमाणे तालुक्यातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी किक बॉक्सिंग स्पर्धेत राज्यस्तरीय गोल्ड मेडल पटकावणारी सानिया शैलेश खोब्रागडे हिचा सत्कार मा. आमदार सुरेशभाऊ लाड यांच्या हस्ते करण्यात आला.