माथेरान (दत्तात्रय शेडगे)थंड हवेचे ठिकाणी म्हणून माथेरान प्रसिद्ध आहे मात्र कोरोना महामारीमुळे माथेरान बंद आहे .या ठिकाणी पर्यटक येत नसल्याने येथील घोडेवाल्यांची आर्थिक परिस्थिती बेताची झाली असून गोर गरीब घोडे मालकांना आपला घोडा सांभाळायला कसा असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
अशा काळातच सामाजिक बांधिलकी जपत प्रसिद्धी जॉकी माथेरानचा सुपुत्र संदेश तुकाराम आखाडे यांनी माथेरान मधील २० घोडे दत्तक घेत त्या २० घोड्यांचा दोन महिन्याचा संपूर्ण खर्च संदेश आखाडे करणार आहे देशात कोरोना आजाराने हाहाकार माजवला असल्याने राज्य सरकारने 15 मे पर्यंत लॉक डाऊन जाहीर केला आहे.
त्यामुळे माथेरान मधील गोर, गरीब, मोलमजुरी करणारे नागरिक, गरीब घोडेवाले यांचे अतोनात हाल झाले आहेत याची दखल घेत सामाजिक बांधिलकी जपत जॉकी संदेश तुकाराम आखाडे यांनी २०घोडे दत्तक घेऊन त्या घोड्यांचा दोन महिन्यांपर्यंतचा पूर्ण खर्च संदेश करणार असल्याने सर्व घोडे मालकांनी संदेशचे आभार मानले आहेत.
संदेशचे वडील तुकाराम आखाडे हे कर्जत तालुका धनगर समाजाचे अध्यक्ष असून समाजासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत कोरोना काळात आपल्या समाजबांधवाना एक हात मदतीचा म्हणून त्यांनी हा उपक्रम हाती घेतला असून यामुळे त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून तुकाराम आखाडे यांची समाजाप्रति असलेली तळमळ यातून दिसून येते.