Sunday, November 24, 2024
Homeपुणेलोणावळाप्लास्टिक बॉटल पासून आकाशकंदील बनविण्याच्या ऑनलाईन कार्यशाळेला विध्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद...

प्लास्टिक बॉटल पासून आकाशकंदील बनविण्याच्या ऑनलाईन कार्यशाळेला विध्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद…

लोणावळा (प्रतिनिधी):स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत “स्वच्छता का उपहार” मधील “स्वच्छता के दो रंग” अंतर्गत पर्यावरणपूरक दिपावली साजरी करण्याकरिता दिनांक 21ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 12:30 वाजता प्लास्टिक बॉटल पासून आकाशदिवे करण्याची ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या ऑनलाईन कार्यशाळेत मोठया प्रमाणावर विदयार्थ्‍यांनी सहभाग नोंदविला होता. लोणावळयातील आर्टीस्‍ट सौ.यशश्री सागर तावरे यांनी या कार्यशाळेत सहभागी विदयार्थ्‍यांना पर्यावरणपूरक आकाशकंदील बनविण्याचे प्रशिक्षण दिले.यावेळी टाकाऊ प्‍लास्‍टीकच्‍या बॉटलपासून विध्यर्थ्यांनी आकर्षक आकाशकंदील बनविले. तसेच सुट्टीच्या काळात घरबसल्‍या टाकाऊ वस्‍तूपासून आकाशकंदील बनविण्‍यास नगरपरिषदेने प्रोत्‍साहन दिल्‍याने सर्व विदयार्थ्‍यांनी नगरपरिषदेचे आभार मानले.
सहभागी सर्व विद्यार्थ्‍यांना लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने प्रशस्‍तीपत्रक देवून सन्‍मानीत करण्यात येणार आहे.
लोणावळा नगरपरिषदेचे मुख्‍याधिकारी पंडीत पाटील यांनी सर्व लोणावळेकर नागरिकांना दिवाळीच्‍या हार्दीक शुभेच्‍छा देवून सर्वानी ही दिवाळी पर्यावरणपूरक पध्‍दतीने साजरी करावी पर्यटकांनी उघडयावर कचरा टाकू नये असे आवाहन केले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page