Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडबिल्डिंग मटेरियल सप्लायर्स असोसिएशनचा आजपासून बेमुदत बंद आंदोलनाला कर्जतमध्ये सुरुवात !

बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स असोसिएशनचा आजपासून बेमुदत बंद आंदोलनाला कर्जतमध्ये सुरुवात !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) गेली दोन वर्षे त्रासाला सामोरे जाताना कुठलाच तोडगा निघत नसल्याने अखेर संपुर्ण कर्जत तालुक्यातील बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स असोसिएशन यांच्या वतीने गुरुवार दि.१३ जुलै २०२३ पासुन संपुर्ण कर्जत तालुक्यात बिल्डिंग मटेरियल सप्लाय करणारी सर्व वाहने बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून आज कर्जत चार फाट्यावर हजारो च्या संख्येने सप्लायर्स या बंद आंदोलनात सहभागी झाले.
मात्र जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत या पावसाळ्यात बांधकाम साहित्य न मिळाल्यास बांधकामे रखडणार असल्याने नागरिकांना देखील त्याचा त्रास होणार असल्याने कर्जत तहसीलदार शीतल रसाळ यांनी ताबडतोब या आंदोलनाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे.या बेमुदत वाहने बंद ची कारणे स्टोन क्रशर वर वाढलेले मालाचे दर कमी करणे , नवी मुंबई येथून येणाऱ्या सप्लायर्स ना मटेरियल देऊ नये , क्रशर असोशिएशन यांनी स्वतःच्या वाहनाने सप्लाय करु नये , बिल्डर / कॉन्ट्रेक्टर कडुन मिळणारा कमी मोबदला , आदी वरिल प्रमुख चार कारणांमुळे सप्लायर त्रस्त झाले असल्याने, वरिल चार गोष्टींवर मार्ग निघत नाही तो पर्यंत बेमुदत स्वरुपाचा बंद ची हाक ” अष्टविनायक बांधकाम मटेरियल सप्लायर्स वेल्फेअर असोसिएशन ” यांनी केली आहे.

वरील कारणांमुळे अनेक सप्लायर्स हैराण झाले आहेत. त्यातच अनेक वेळा ग्राहक असलेले बिल्डर हे पैसे सहा महिने ते वर्षभर थकवतात. त्यामुळे जीएसटी भरणे, माल विकत घेणे आणि पोहोचवणे, गाडीचा मेंटेनन्स , गाडीचे हफ्ते या सर्व बाबींचा मेळ बसत नाही. यावर जोपर्यंत तोडगा निघत नाही , तोवर या बंद मध्ये सर्व सामील होणार असून गुरुवार दि. १३ जुलै २०२३ रोजी कर्जत चारफाटा येथे सकाळी ९ वाजता हे बेमुदत आंदोलन सुरू झाले असून या आंदोलनास शिवसेना – उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत , यांनी या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला आहे .
- Advertisment -

You cannot copy content of this page