वडगाव : स्वच्छ सर्वेक्षण 2022 आणि माझी वसुंधरा 2.0 अभियान अंतर्गत वडगाव नगरपंचायत व नगराध्यक्ष मयूर ढोरे मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मधमाशी पालन व व्यवस्थापन शिबीराचे शुक्रवार 31/01/2021 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.
वडगाव नगरपंचायत कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.तरी शहरातील नागरिकांनी व निसर्ग प्रेमींनी उत्साही सहभाग नोंदवावा अशी नम्र विनंती नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी केले आहे.
सदर प्रशिक्षण शिबिरात मधुकर्मयोगी पुरस्कार विजेते
विजयजी महाजन हे प्रशिक्षक म्हणून असणार असून या शिबिराचे आयोजन वडगाव नगरपंचायत चे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, आरोग्य सभापती, मुख्याधिकारी तसेच
सर्व सन्माननीय नगरसेवक आणि नगरसेविका अधिकारी व कर्मचारी वर्ग वडगाव नगरपंचायतच्या वतीने करण्यात आले आहे.