Thursday, July 3, 2025
Homeपुणेलोणावळामहंम्मद पैगंबर जयंती निमित्त आयोजित विविध स्पर्धांमध्ये 200 विध्यार्थ्यांचा सहभाग…

महंम्मद पैगंबर जयंती निमित्त आयोजित विविध स्पर्धांमध्ये 200 विध्यार्थ्यांचा सहभाग…

लोणावळा (प्रतिनिधी): TSAT Group व सुन्नी मुस्लीम जमात लोणावळा शहर यांच्या वतीने ईद-ये. मिलादून नबी निमित्त “नात-ए-रसूल मुकाबला 2023″चे आयोजन रविवार दि.8 रोजी करण्यात आले. या स्पर्धेत तब्बल 200 विध्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला.या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी सायंकाळी हजरत कासीम शाहवली दर्गाह रायवूड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत उद्योजक झिशान भाई हनीफ भाई शेख,उद्योजक फरहान भाई हनीक भाई शेख,मौलाना मोहम्मद गौस पिर शाह कादरी अशरफी,मोहम्मद नदीम अशरकी हाफिज, मुरशीद मोहम्मद शाहीद सिद्दिकी नुरी, मोहम्मद फैजान अशरफी, गुलाम अहमद कादरी,रफीक हुसेन शेख (व्हाईस चेरमन मिनारा मस्जीद),हाजी नूर अहमद काठेवाडी (ट्रस्टी मिनारा मस्जीद), सामाजिक कार्यकर्ते अनवर निंबरगी, उद्योजक जमीर रमजान शेख आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
आयोजित नात मुकाबला हा ABC अशा तीन गटामध्ये घेण्यात आला. या तिन्ही गटांमध्ये लहान मोठी असे दोनशे स्पर्धकांनी भाग घेतला. यामध्ये A गटात प्रथम हमाद नुरआलम शेख, द्वितीय आयेशा ताहीर शेख, तृतीय अहमद आमिन शेख आला. तर B गटात प्रथम मोहम्मद अबरार समीर शेख, द्वितीय मुबीन शरीफ शेख, व तृतीय क्रमांकावर कु.रईसा जमीर शेख हिने बाजी मारली तसेच C गटातून फातिमा झबीउल्लाह खान प्रथम आली तर द्वितीय रेहान सलीम अत्तार, व तृतीय क्रमांकावर इराम झाहीद हुसैन सिद्दीकी याने बाजी मारली. त्याचबरोब खुला गट निबंध स्पर्धेत प्रथम सुमैया हमझा खान, द्वितीय नसीम झुबेर मलीक व तृतीय ईशान अब्बास सय्यद याने बाजी मारली.
यावेळी उद्योजक हनीफ भाई शेख यांच्या वतीने प्रत्येक विजेता स्पर्धकाला प्रत्येकी 1 हजाराचे रोख बक्षीस देण्यात आले.तर TSAT Group च्या वतीने एक विजेत्या स्पर्धकाला प्रथम क्रमांकासाठी प्रमाणपत्र,आकर्षक ट्रॉफी,गिफ्ट व रोख 1500, द्वितीय क्रमांकासाठी प्रमाणपत्र, आकर्षक ट्रॉफी, गिफ्ट व 1000, तृतीय क्रमांकासाठी प्रमाणपत्र, आकर्षक ट्रॉफी, गिफ्ट व 500 रु. रोख रक्कम असे बक्षीस प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सईद सर व रजामुराद सर यांनी केले. आयोजन TSAT Group चे प्रमुख ताहीर शेख सर,सद्दाम खान,आझाद खान, तज्जमुल शेख यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशरफ हवारी, शाहनवाज, बारिश चौधरी, ओवेस खान, विशाल चव्हाण, गणेश राम, अमीन शेख, रेहान खान, सकलैन खान तसेच मुलींमध्ये रिफत खान,आदिबा गदवाल, बिलकिस सय्यद,तनाज शेख, रुखसार खान, निकहत बेबल, या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.शेवटी सईद सर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.अगदी खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.
- Advertisment -

You cannot copy content of this page