लोणावळा (प्रतिनिधी):सदर महाराष्ट्र वाहतुक सेना ( महासंघ ) च्या “ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष “ पदी महेश केदारी यांची नेमणुक करण्यात आली आहे .
” पुणे,सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा,अहमदनगर जिल्ह्यातील “ सर्व वाहतुकदारांशी संपर्क साधून संबंधित शिवसेना पदाधिकारी , खासदार , आमदार , यांच्याशी सल्लामसलत करुन संघटना वाढविण्याचे कार्य करावे अशी अपेक्षा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आज सदर नियुक्तीचे पत्रक अध्यक्ष उदय दळवी यांच्या हस्ते महेश केदारी यांना देण्यात आले.
त्याचबरोबर हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आशिर्वादाने आपणांस प्राप्त झालेल्या पदाचा सन्मान राखावा तसेच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे अशी अपेक्षा ठेवत पुढील सहा महिन्याचे कार्य पाहून आपली पदनियुक्ती वाढविण्याबद्दल विचार केला जाईल असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.