Friday, November 22, 2024
Homeपुणेवडगावमहाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेल्याच्या निषेधार्थ मावळ शिवसेना व युवासेनेचे आंदोलन...

महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेल्याच्या निषेधार्थ मावळ शिवसेना व युवासेनेचे आंदोलन…

वडगांव (प्रतिनिधी): मावळ व महाराष्ट्रातील हजारो युवकांना रोजगार व देशाला आत्मनिर्भर बनविणारा वेदांता फॉक्सकॉन हा सेमी कंडक्टर बनविण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात मध्ये पळविल्याच्या निषेधार्थ आज मावळ शिवसेनेने आक्रमक होत मावळ तहसिल कार्यालयावर मोर्चा काढत प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात व मावळात यावा अशी मागणी करणारे निवेदन सादर केले .

महाविकास आघाडीच्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारने तैवान येथील फॉक्सकॉन व वेदांता कंपनीचा सेमी कंडक्टर बनविण्याचा प्रकल्प पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात आणला होता . कंपनीच्या प्रतिनिधींनी याठिकाणी असलेल्या जागेची पाहणी केली . तत्कालिक पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे , उदयोगमंत्री सुभाष देसाई यांनी याकरिता प्रयत्न केले होते.

या प्रकल्पामुळे मावळ तालुका व महाराष्ट्रातील 1 लाख युवकांना रोजगार मिळणार होता. परंतु महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर हा प्रकल्प गुजरातला हालविण्यात आला आहे . यामुळे मावळ व महाराष्ट्राच्या विकासाला खीळ बसणार असल्याने आज मावळ शिवसेना व युवासेना यांनी आक्रमकपणे हा प्रकल्प पुन्हा मावळात यायला हवा याकरिता तहसील कार्यालयावर आंदोलन केले.

सदरचा प्रकल्प आपल्या राज्यांमध्ये यावा याकरिता अनेक राज्यांनी प्रयत्न केले मात्र प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जागा व पायाभुत सुविधा महाराष्ट्रात उपलब्ध असल्याने हा प्रकल्प मावळात आला होता . महाराष्ट्रात सेमिकंडक्टर तयार झाले असते तर देशात महाराष्ट्राचे महत्व वाढले असते.महाराष्ट्राचे हे महत्व कमी करण्यासाठी हा प्रकल्प सत्तांतर होताच गुजरात राज्यात पळविला असल्याचा आरोप शिवसेना माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे यांनी केला आहे.

यावेळी युवासेना विस्तारक राजेश पळसकर , माजी शिवसेना जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे , शैलाताई खंडागळे , भारत ठाकूर , सुरेश गायकवाड , युवासेना जिल्हा अधिकारी , अनिकेत घुले , तालुका अधिकारी विजय तिकोणे , रमेश जाधव , अमित कुंभार , आशिष ठोंबरे , संतोष येवले , विशाल दांगट , राम सावंत , उमेश गावडे , तानाजी सावंत यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

- Advertisment -

You cannot copy content of this page