Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडमहिला भगिनी आणि कार्यकर्त्यांनी घेतले " श्री सोमजाई मातेचे दर्शन व सुधाकर...

महिला भगिनी आणि कार्यकर्त्यांनी घेतले ” श्री सोमजाई मातेचे दर्शन व सुधाकर भाऊ घारे ” यांची भेट !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे )आपल्या जन्म गावातील कुलदैवत असलेल्या ” श्री सोमजाई मातेच ” आकर्षक मंदिर उभारून आईच्या आशीर्वादाने जन सामान्य नागरिकांची सेवा करण्यात अग्रेसर असलेले कर्जत खालापूर मतदार संघातील गोर गरीब जनतेचे ” आधारस्तंभ , लोक नेते ” सुधाकर भाऊ घारे यांनी आयोजित केलेल्या मकरसंक्रांत निमित्ताने मंगळवार दिनांक १४ जानेवारी २०२५ रोजी श्री सोमजाई माता मंदिर , सांगवी, येथे ” श्री सोमजाई मातेच्या उत्सवानिमित्त ” श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली होती . या उत्सवास व आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमास ” अभूतपूर्व गर्दीने ” उच्चांक केला . श्री सोमजाई मातेचे दर्शन व लोकनेते तथा राजिपचे मा. उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांची जिल्ह्यातून तसेच मतदार संघातून अनेक मान्यवरांनी भेट घेतली .

त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . काकडआरती – सकाळी ६.०० वा. , श्री सत्यनारायणाची महापूजा – दुपारी १२.०० वा. , हरिपाठ – दुपारी ३. ३० ते ४. ३० पर्यंत. ( कर्जत तालुका परिसर ) , हळदी-कुंकू व खेळ पैठणीचा सायं. ४.३० ते ७.३० वा. महाप्रसाद – रात्री ७.३० ते (आपल्या आगमना पर्यंत ) , चक्रीभजन – रात्री ९ ते ११ वा. ( वासरे खोंडा परिसरातील भजनी मंडळे ) यांचे होते . हळदी कुंकू समारंभ २०२५ प्रमुख आकर्षण ” हा खेळ पैठणींचा ” रंगतदार खेळ खेळा , भरपूर बक्षिसे जिंका ! खेळ, गप्पा, गोष्टी, गाणी, विनोद व नकला असलेला महिलांसाठी रंगतदार कार्यक्रमास महिला भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला . यामध्ये प्रथम १० विजेत्या महिलांना मानाची पैठणी , उत्तेजनार्थ बक्षिसे २५ महिलांना सोन्याची नथ , कुकर , तर आलेल्या प्रत्येक महिला भगिनिस साडी वाटप करण्यात आली .

या कार्यक्रमास खास आकर्षण प्राप्ती रेडकर – सावल्यांची जणू सावली फेम सावली व साक्षी गांधी – सहकुटुंब सहपरिवार फेम अवनी , निलेश पापट – होम मिनिस्टर टी.व्ही., एफ.एम. रेडिओ, सिनेमा फेम सुप्रसिद्ध निवेदक , यांच्या रंगतदार व बहारदार कार्यक्रमाचे आयोजन केले होते . या प्रसंगी सर्व राजकीय – सामाजिक – अध्यात्मिक – शैक्षणिक – सांस्कृतिक – कला क्षेत्रातील सर्व मान्यवर व नागरिक बंधु-भगिनीं मोठ्या संख्येने अभूतपूर्व गर्दीने उपस्थित राहून ” न भूतो न भविष्यती ” असा कार्यक्रम ” जल्लोषात ” साजरा झाला . या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक राजिपचे मा. उपाध्यक्ष सुधाकर भाऊ परशुराम घारे , मा. सरपंच खांडपे परशुराम आप्पा घारे , मा. सरपंच खांडपे मधुकर परशुराम घारे व हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजक सौ. भारती घारे , सौ. नमिता घारे – मा. सरपंच खांडपे व महिला मंडळ – सांगवी यांनी सर्व मान्यवर , महिला भगिनी यांची भेट घेतली . यावेळी कर्जत – दहीवली ते सांगवी हा रस्ता गाड्यांच्या ताफ्याने भरला होता . तर कर्जत पोलीस ठाण्या तर्फे चोख बंदोबस्त ठेवला होता .
- Advertisment -

You cannot copy content of this page