Thursday, March 13, 2025
Homeपुणेलोणावळामहिलांच्या स्वावलंबनासाठी व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न..

महिलांच्या स्वावलंबनासाठी व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न..

लोणावळा : लोणावळा नगरपरिषद महिला व बालकल्याण विभाग आणि मीरा महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण समारंभ शुक्रवारी (७ फेब्रुवारी) आयोजित करण्यात आला. या समारंभात व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
समारंभाला लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे, उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी, मीरा महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा रेश्मा शेख, तसेच प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना मुख्याधिकारी अशोक साबळे म्हणाले, “महिलांनी स्वतःतील सुप्त कौशल्यांना वाव देत अधिक सक्षम व्हावे. व्यवसाय कौशल्य आत्मसात करून महिलांनी स्वावलंबी होण्याकडे लक्ष द्यावे. अशा उपक्रमांमुळे महिलांचा आर्थिक तसेच सामाजिक स्तर उंचावेल.”
मीरा महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा रेश्मा शेख यांनी संस्थेच्या महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंना नगरपरिषदेच्या माध्यमातून अधिक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा, अशी विनंती केली.
या उपक्रमाद्वारे महिलांना आर्थिक स्थैर्य मिळविण्यासाठी आणि त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी मदत होणार आहे. महिलांच्या हाती रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम एक सकारात्मक पाऊल असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
- Advertisment -

You cannot copy content of this page