if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
विद्यार्थी व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करून गुंडगे प्रभागाचे नगरसेवक उमेश आप्पा गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा !
भिसेगाव-कर्जत ( सुभाष सोनावणे ) सामाजिक जाणीवतेचे भान ठेवून आपणही या समाजाचे देणे आहोत , या उद्दात हेतूने प्रेरित होऊन आपला वाढदिवस दरवर्षी विविध लोकपयोगी कार्यक्रम राबवून साजरा करणारे कर्जत नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा गुंडगे प्रभागाचे विद्यमान नगरसेवक उमेश आप्पा गायकवाड यांचा यावर्षीचा ०१ जुलै २०२३ रोजीचा वाढदिवस सामाजिक – शैक्षणिक – लोकपयोगी – महिलांचे सबळीकरण , विद्यार्थी व समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करून साजरा करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत नगर परिषद प्रभाग क्रमांक ९ गुंडगे प्रभागाचे नगरसेवक उमेश आप्पा श्रीरंग गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त गुंडगे – समाज मंदिर येथे ” बार्टी ” या संस्थेच्या वतीने महिला व्यवसाय प्रशिक्षण शिबिर आयोजित केले असता प्रथम महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला . यावेळी उमेश आप्पा गायकवाड यांनी महिलांनी चूल आणि मूल यांच्या बंधनात न रहाता व्यवसायात उतरून स्वताच्या पायावर उभे रहाणे गरजेचे आहे , यासाठी येणाऱ्या वर्षभरात मी स्वतः मदत करून १० महिलांना व्यवसायात सर्वपरिने मदत करेन , तर आपल्या सर्वांच्या पाठीशी ” बार्टी ” या संस्थेचे अधिकारी वर्ग असेल , असे मत व्यक्त केले . यावेळी संस्थेचे राहुल हनुवंते , डॉ . नंदकिशोर इंगोले , दयानंद सोनवले , नरेश अहिरे , तसेच इतर कर्ज देणारे अधिकारी वर्ग यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
प्रत्येक वर्षी नागरिकांच्या व विद्यार्थी, महिलावर्ग यांच्या हिताचे व महत्वाचे उपक्रम राबविणे हे जणू लोकप्रिय नगरसेवक उमेश आप्पा गायकवाड यांचे जीवनाचे माध्यम झाले आहे . म्हणूनच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून अतिशय नम्र स्वभावाचे , आदर ठेवणारे उमेश आप्पा गायकवाड सर्वांच्याच मनात घर करून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे , त्यांचे करिअर व्हावे , महिलांचे आर्थिक सबळीकरण व्हावे यासाठी तसेच वृक्षारोपण , विद्यार्थांचे शासकीय दाखले शिबीर , रक्तदान शिबिर , आरोग्य शिबीर घेऊन देशव्यापी व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विभुतींना सन्मानित करून त्यांना प्रोत्साहित करत असतात . कोरोना काळात देखील त्यांनी नागरिकांना अन्न – धान्य , कौटुंबिक वस्तू मदत देऊन खूप मोठे कार्य केले.
यावेळी मंगेश बोरकर यांनी दहावी बारावी किंवा पदवीधर झाल्यावर काय करायचे , याबाबतीत आयपीएस – आयएएस अधिकारी व्हायचं असेल तर mpsc – upsc परीक्षा पास होणे गरजेचं आहे , मार्क चांगले मिळणे म्हणजे तुम्ही हुशार आहात असे नाही , या क्षेत्रात योग्य मार्गदर्शन व्हावे म्हणून त्यासाठी गुरू असल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही , मार्गदर्शन महत्वाचे आहे , भविष्यात योग्य पॅकेज आणि पॉवर हवी असेल तर योग्य मार्गाची गरज ,आर्मी नेव्ही ची परीक्षा द्या , करिअर हा विषय सिरीयसली घ्या ,असे मार्गदर्शन केले . यावेळी नेहा आढाव , डॉ . यादव , संतोष दगडे यांनी देखील आपले यशस्वी होण्याचे महत्वपर्ण मार्गदर्शन केले.
यावेळी झालेल्या विविध कार्यक्रमात माजी राजिप उपाध्यक्ष तथा आरोग्य – क्रीडा-शिक्षण सभापती सुधाकरशेट घारे , माजी राजिप अध्यक्ष सुरेश दादा टोकरे , माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक शरद भाऊ लाड , डॉ . सुनील ढवळे , नगरसेवक सोमनाथ ठोंबरे , नगरसेविका पुष्पा दगडे , सुवर्णा निलधे , पालकर , पालिकेचे प्रथम उपनगराध्यक्ष व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष उत्तमभाई जाधव , भास्कर दिसले , माजी उपनगराध्यक्ष वसंत मामा सुर्वे , बळीराम देशमुख , माजी नगरसेवक संतोष पाटील , संदीप पाटील , कांगणे सर , आप्पा साळवे , मधुकर जाधव ,सुरेश सोनावळे , सुनील गायकवाड , जनार्दन खंडागळे , ऍड. शैलेश पवार , बीएसपीचे नेते सचिन चव्हाण , कामगार नेते चरण जाधव , मल्हारी शेठ माने , सुनिल चव्हाण , धारगावे साहेब , जंगम , खैरे , सुर्वे सर , एव्हरेस्ट सर करणारे संतोष दगडे , एम पी एस सी परिक्षेत उतीर्ण झालेल्या नेहा राजेंद्र आढाव , ऍड भावना विशाल पवार , डॉ. यादव , संतोष पेरणे ,सोमजाई मित्र मंडळाचे अध्यक्ष – शैलेश शिंदे , अमोल साळवी , सुभाष गायकवाड , जगदीश ठाकरे , महेंद्र कानिटकर , शैलेश देशमुख , त्याचप्रमाणे गुंडगे प्रभागातील मान्यवर , अनेक नागरिक , महिलावर्ग नगरसेवक उमेश आप्पा गायकवाड यांना शुभेच्छा देण्यासाठी व विविध कार्यक्रमात उपस्थित होते . यावेळी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
दहावी – बारावी – पदवीधर विद्यार्थी विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधान , शाल , सन्मानचिन्ह व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला .तर महिलांना कापडी पिशव्या , पत्रकार बंधूना बॅग देवून सन्मानित करण्यात आले . यावेळी उमेश आप्पा गायकवाड मित्र मंडळींनी मोलाचे सहकार्य केले . आई मुक्ताई व वडील बंधू रमेश दादा , सुरेश भाऊ , वडील श्रीरंग व गणेश दादांचे आशीर्वाद त्याचप्रमाणे नेहमीच सावली सारखी प्रत्येक कार्यात सहभागी असणारी पत्नी हर्षाली व कुटुंबातील सर्व सदस्यांच्या तसेच मित्र परिवाराच्या सहकार्यामुळेच माझ्या हातून ही समाजसेवा होत असून मी इथवर पोहचलो , असे मत लोकप्रिय नगरसेवक तथा भीम जयंती उत्सवाचे कर्जत तालुका अध्यक्ष उमेश आप्पा गायकवाड यांनी व्यक्त केले .या कार्यक्रमाचे समीर सोमने यांनी सुमधुर शब्दात प्रस्तावना केली .