Wednesday, November 20, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमावळ लोकसभा निवडणुकीत " मनसे " ठरणार निर्णायक , जिल्हाध्यक्ष " जितेंद्र...

मावळ लोकसभा निवडणुकीत ” मनसे ” ठरणार निर्णायक , जिल्हाध्यक्ष ” जितेंद्र दादा पाटील ” लढणार निवडणूक !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) मावळ लोकसभा मतदार संघात महाराष्ट्र नव निर्माण सेनेने मजबूत मतदार संघ बांधला आहे. जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटन बांधणी शहरापासून ग्रामीण भागापर्यंत केलेली असल्याने तसेच महिला पदाधिकारी बांधणी देखील मोठ्या संख्येने असल्याने मावळ लोकसभा मतदार संघात येणाऱ्या कर्जत – खालापूर , पनवेल व उरण विधानसभा मतदार संघात लाखाच्या वर मनसे कार्यकर्ते व मतदार असल्याने पक्षास हि जमेची बाजू आहे तर वर घाटात देखील मनसे चे मतदार मोठ्या संख्येने असून या जोरावरच रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील यांनी यावेळी मावळ लोकसभा निवडणूक लढविण्यास ” दंड थोपटून ” उभे असून तयारीला लागले आहेत , फक्त पक्षाचे सर्वेसर्वा राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाच्या ” प्रतिक्षेत ” असल्याचे मत जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील यांनी व्यक्त केले आहे.

मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील हे मराठा समाजाचे आहेत . त्यांचे नातेगोते रायगडात मोठ्या प्रमाणात आहेत . रायगडात तिन्ही विधानसभा मतदार संघात त्याचे कार्य वाखाणण्याजोगे आहे . कोरोना काळात त्यांनी केलेली नागरिकांना मदत , गोर गरीब नागरिकांच्या समस्या सोडविण्यात मनसे त्यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच अग्रेसर रहात आहे . कामगारांचे प्रश्न सोडवून त्यांनी मनसे तळागाळात रुजविली आहे , नागरिकांच्या फायनान्स बँकेच्या समस्या , टोल फ्री करण्यासाठी त्यांची आंदोलने , बेरोजगार तरुणांसाठी मेळावे , शेतकरी बांधवांसाठी चर्चा सत्र , महिला भगीनिंसाठी आंदोलने नेहमीच गाजली आहेत , तर आरोग्य शिबिर , शासकीय दाखले शिबिर , रक्तदान शिबिरे आयोजित केली आहेत , कला – क्रीडा – सांस्कृतिक क्षेत्रात कबड्डी – क्रिकेटचे सामने घेवून तर ऐतिहासिक कार्यक्रम ठेवून त्यांनी मातीतील खेळ घेवून खेळाडूंना व कलाकारांना प्रोत्साहित केले आहे.
मराठी भाषा जिवंत राहण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्ते मराठी पाट्या , स्वाक्षरी घेवून मराठी भाषा दिंन कार्यक्रम या मतदार संघात राबवित आहेत . गोर गरीबांना , अपंग नागरिकांना त्यांचे नेहमीच सहकार्य असते , ते मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष असल्याने कामगारांची फळी देखील त्यांच्या पाठीशी उभी आहे . मनसे पक्ष प्रमुख राजसाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे असल्याने त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन देखील या मावळ लोकसभा मतदार संघात सर्वांच्याच स्नेहाचा असल्याने त्यामुळे त्यांचां चाहता वर्ग या मतदार संघात मोठ्या प्रमाणात आहेत , हि एक विजय खेचून आणण्यात त्यांच्या जमेची बाजू आहे.

येणाऱ्या मावळ लोकसभेच्या निवडणुकीत मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील हे निवडणूक लढणार असल्याने या तीन विधानसभा मतदार संघात व वर लोणावळा , पिंपरी चिंचवड मतदार संघातील मतदार पहाता त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सरपंच , सदस्य , नगरसेवक यांची संख्या पाहता त्यांचां विजयी निश्चित असून पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व आशीर्वादाने ते येणाऱ्या निवडणुकीत ” कंबर कसणार ” असून त्यांच्या उमेदवारीने इतर पक्षात नक्कीच घबराट होणार आहे . घोडा मैदान आता जवळ आला असून त्यांची उमेदवारी निश्चित झाल्यास कार्यकर्ते देखील तन मन धन अर्पून प्रचाराच्या तयारीस लागतील , व त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करतील , यांत शंकाच नसेल.
- Advertisment -

You cannot copy content of this page