if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
भाजपा धनगर समाज परिषदेची कार्यकारिणी जाहीर,धनगर समाजातील तरुणांना दिली संधी..
खोपोली- दत्तात्रय शेडगे
भारतीय जनता पार्टी धनगर समाज मावळ तालुका परिषदेची कार्यकारिणी नुकताच जाहीर झाली असून यामध्ये भाजप ने धनगर समाजातील तरुणांना संधी देण्याचे काम केले आहे.
यामध्ये भारतीय जनता पार्टी धनगर समाज मावळ तालुका परिषदेच्या मावळ तालुका उपाध्यक्ष पदी वाघू कोकरे (आपटी) धामणदरा, कार्याध्यक्षपदी ज्ञानेश्वर जानकर, सरचिटणीस पदी अमोल ठोंबरे (वडगाव मावळ ),चिटणीस पदी धाऊ मरंगले ( मालेवाडी),प्रसिद्धी प्रमुख पदी विठ्ठल शेडगे खजिनदार अंकुश शेडगे ,नाणे मावळ अध्यक्ष बबन गोरे, यांची नुकितीच निवड करण्यात आली ,
ही कार्यकारिणी मा .राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे व जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे आणि मावळ तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली असून त्यांना काल नियक्तती पत्र देण्यात आले.
ही मीटिंग नुकतीच पक्ष कार्यालय वडगाव मावळ येथे पार पडली, यावेळी मा राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश (तात्या ) भेगडे, भाजपा मावळ तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे, संघटन मंत्री किरण राक्षे, सरचिटणीस सुनील चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, महिला आघाडी अध्यक्षा सायलीताई बोत्रे, पंचायत समिती सभापती निकिता घोटकुळे, उपसभापती दत्ता शेवाळे, भाजपा धनगर समाज परिषद मावळ तालुका अध्यक्ष नामदेव शेडगे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.