if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
तळेगाव (प्रतिनिधी): दि.27 4 पिस्तूल व 14 जिवंत काडतुसे जप्त करून दोन आरोपींना अटक केली. तीन आरोपी फरार झाले. ही कारवाई रविवारी (दि.25) रात्री 8:15 वा. तळेगाव दाभाडे स्टेशन चौकात येथे केली.
दरोडा विरोधी पथक गुन्हे शाखा पोलीस नाईक आशिष बनकर यांनी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून वडगाव मावळ न्यायालयाने सोमवारी दि. 26 रोजी आरोपींना शनिवार दि.1 जुलै पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा मिळाल्याने मावळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.
प्रमोद सोपान सांडभोर (वय 33, रा.हरणेश्वरवाडी तळेगाव दाभाडे ता. मावळ),शरद मुरलीधर साळवी (वय 30, रा. ज्ञानेश्वर कॉलनी काळेवाडी, मूळ अवहातरबाला,भदनापुर, जालना) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
तर मंगेश मोरे (माळीनगर वडगाव ता. मावळ),अक्षय चौधरी उर्फ आर्ची (रा. सिद्धार्थनगर तळेगाव दाभाडे ता. मावळ) व अमित परदेशी (रा. तळेगाव दाभाडे ता. मावळ) अशी फरार आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार दि.25 रोजी रात्री 8:15 वा. तळेगाव दाभाडे एस टी बस स्थानक परिसरामध्ये आरोपी प्रमोद सांडभोर व शरद मुरलीधर साळवी हे त्यांचेकडील मारुती सुझुकी आल्टो कारमधुन दोघांनी त्यांचे कमरेस प्रत्येकी एक लोखंडी गावठी पिस्टल व प्रत्येकी दोन जिवंत काडतुसे कोणताही कायदेशीर परवाना नसताना जवळ अवैधरित्या बाळगले.तसेच त्यांचेकडील कारमध्ये दोन लोखंड़ी गावठी पिस्टल व दहा जिवंत काडतुसे जवळ बाळगले होते.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय दि. 10 जून यांच्या आदेशान्वये पिंपरी चिंचवड शहरात पोलीस आयुक्तलय कार्यक्षेत्रात दि. 13/06/2023 ते दि.26/06/2023 पर्यंत कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील दगड अथवा शस्त्रे, अस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, लाठी, बंदुका किंवा शारीरीक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर नेणे अथवा बाळगणे बाबत मनाई आदेश असताना, सदर आदेशाचा भंग केला आहे. तसेच सदरचे मिळुन आलेले एकुण चार लोखंडी गावठी पिस्टल व 14 जिवंत काडतुसे हे आरोपी शरद साळवी याने त्यांचे मित्र आरोपी मंगेश मोरे, अक्षय चौधरी उर्फ आर्ची, व अमित परदेशी यांचेसोबत मिळुन मध्यप्रदेश येथे जावुन आणले असल्याने त्यांचेविरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम 3 (25) भा.द.वि.क.34 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) सह 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरेश देशमुख, पोलीस अंमलदार गणेश हिंगे,आशिष बनकर, सुमित देवकर, गणेश कोकणे, गणेश सावंत आदींच्या पथकाने केली.