Friday, September 20, 2024
Homeपुणेमावळमावळात गांजा,अंमली पदार्थ व उत्तेजक इंजेक्शन अवैधरित्या विक्रीसाठी आनणाऱ्या दोन आरोपींना अटक..

मावळात गांजा,अंमली पदार्थ व उत्तेजक इंजेक्शन अवैधरित्या विक्रीसाठी आनणाऱ्या दोन आरोपींना अटक..

मावळ (प्रतिनिधी):शिरगाव परंदवडी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत मेफेनटरमाईन सल्फेट नावाचे (उत्तेजक इंजेशन) व गांजा विक्री करणाऱ्या दोन आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे. ही कारवाई दि.16/8/2023 रोजी रात्री 9:30 च्या सुमारास शिरगांव येथील अभिमान सोसायटी रोड जवळ करण्यात आली.
याप्रकरणी 1)सुमित गणेश पिल्ले ( वय 32 वर्षे, सध्या रा. कृष्णा कॉलणी, साई निवास, काका पेट्रोलपंपा जवळ, साने चौक, चिखली, पुणे, मुळ रा. फ्लॅट नं 203, सोनिग्रारपल, दांगटवस्तीचे पाठीमागे, विकासनगर, देहुरोड, ता हवेली,जि पुणे) व 2) चैतन्य उमेश कुन्हाडे, (वय 21 वर्षे, रा फ्लॅट नं एस 5, नवरत्न सोसायटी, डिमार्ट जवळ, विकासनगर, किवळे, देहुरोड, ता. हवेली, जि.पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन हद्दीमधील मौजे शिरगाव ता मावळ जि पुणे येथे अभिमान सोसायटी समोर रोडचे बाजुला दोन इसम अंमली पदार्थ व औषधांची बेकायदेशीर रित्या विक्री करणे कामी येणार आहे.अशी गुप्त बातमी दाराकडून बातमी मिळाल्याने शिरगाव परंदवडी पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचुन अतिशय शिताफिने दोघांना ताब्यात घेतले असून आरोपीं जवळ 1375 /- रुपये किंमतीचा 55 ग्रॅम वजनाचा गांजा अंमली पदार्थ व MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP इंजेक्शनच्या 145 पॅकबंद बाटल्या औषध अंदाजे 45675/- रु.किंमतीच्या व रोख रक्कम 4000/-रुपये तसेच दोन दोनचाकी वाहने व लोखंडी सुरा असा एकुण 1,21,350 /- रु किं चा मुद्देमाल मिळुन आला आहे.
आरोपीविरोधात शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशनमध्ये गु. रं.नं. 241 / 2023 भादवि कलम 276,336,327 व एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम 8(क), 20(ब) (ii) (ब) सह भारतीय हत्यार कायदा कलम 4,25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर औषध केमिकल असुन, डॉक्टरांचे सल्ल्या शिवाय वापरल्यास व व्यक्तीस टोचल्यास त्यातील विषारीद्रव्याचे दुष्परिणाम होवुन, औषध घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यु किंवा आरोग्यास गंभीर इजा होऊ शकते हे माहित असतांना सुध्दा बॉडी बिल्डिंग व नशेसाठी बेकायदेशीररित्या औषध विक्री करताना सदर आरोपींना अटक करण्यात आली असून सदर गुन्हयाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ हे करत आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ संजय शिंदे , अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त डॉ. काकासाहेब डोळे,सहा. पोलीस आयुक्त, देहुरोड विभाग, पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली शिरगांव परंदवडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता एस. धुमाळ, पो.हवा. टी. सी. साबळे, पो.ना. एस. बी. घाडगे, पो.ना. वाय. जे. नागरगोजे, पो.अंमलदार एस. एल. फडतरे व पो.अंमलदार डी. व्ही.राठोड यांच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page